Sharad Pawar MLA : …. तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल; शरद पवारांच्या आमदारांचा वरिष्ठ नेत्यांना इशारा

Sharad Pawar MLA : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन तुतारीवर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शरद पवार गट एनडीएसोबत जाणार

Sharad Pawar MLA

Sharad Pawar MLA

Sharad Pawar MLA : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन तुतारीवर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शरद पवार गट एनडीएसोबत जाणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटातील आमदार आणि खासदार देखील एनडीएसोबत जाण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे. तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा शरद पवार गटातील आमदारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दिला असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, भाजपसोबत जाण्याबाबत आमदरांची मते जाणून घेण्याची जबाबदारी पक्षाच्या ज्या नेत्यांवर सोपविण्यात आली होती त्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) वगळता इतर 9 आमदारांची मते जाणून घेतली असून यापैकी बहुतेक आमदार भाजपसोबत जाण्यास तयार आहे असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे विकासकामांसाठी निधी मिळत नाही त्यामुळे पुढची निवडणूक कशी लढायची असा सवाल सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी केला आहे. तर सत्तापक्षाचा भाग झाल्याशिवाय मतदारसंघांचा विकास करता येणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक आमदारांनी घेतली आहे.

तर दुसरीकडे ज्याप्रमाणे ठाकरे गटाचे सहा खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील (NCPSP) आमदारांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करावे अशी अट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घातली असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री?

शरद पवार पक्षाचे आमदार आणि जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.

एसटी महामंडळाची 13.50 टक्के भाडेवाढीची तयारी, डिझेल, टायर आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव खर्चाचा परिणाम

तर दुसरीकडे ईश्वरपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांना अतिक्रमण व अनधिकृत प्रकरणी अपात्र ठरविण्यात आल्याने जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती असं देखील सांगण्यात येत आहे.

Exit mobile version