काही सुधारणा करणे गरजेचे… सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आक्षेप, प्रफुल्ल पटेलांची पहिली प्रतिक्रिया

Praful Patel यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला पक्षातून आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Praful Patel

NCP Sachchidanand Singh Objection Sunetra Pawar’s appoint National President Praful Patel’s first reaction : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता या अध्यक्षपदाला पक्षातून आक्षेप घेण्यात आला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह (Sachchidanand Singh) यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. यावर आता पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

सुनेत्रा पवार यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीशी माझा कोणताही संबंध नाही. त्या नोटिशीला अनावश्यक महत्त्व देण्याची गरज नाही त्यावरून कोणतेही वेगळे अर्थ काढू नयेत. सुनेत्रा पवार यांची नियुक्ती पक्षाच्या संविधान आणि नियमांनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबत कोणतीही शंका उपस्थित करण्याचे कारण नाही. पक्षाच्या भविष्यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून काढण्यासाठी संघटनात्मक स्तरावर काही बदल आणि सुधारणा करण्याची गरज आहे. या संदर्भातील माझे विचार मी संबंधित नोटीस येण्यापूर्वीच अनौपचारिक चर्चांमध्ये मांडले होते. माझ्या वैयक्तिक मताचा आणि सुनेत्रा पवार यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीचा कोणताही संबंध जोडणे योग्य ठरणार नाही.

नेमकं प्रकरण काय?

पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह (Sachchidanand Singh) यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षाच्या अध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांना 9 जुलै रोजी नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांनी नोटीशीमध्ये काही मुद्दे उपस्थित केले आहेत. सर्व अधिकार प्रफुल्ल पटेल यांना होते. तर बैठक का बोलविण्यात आली आहे. अध्यक्ष निवड पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

follow us