सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून नोटीस; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी केला विषय क्लिअर

आम्ही एकत्रित बसून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी पक्ष एकसंघ आहे.

News Photo   2026 07 14T181458.102

राष्ट्रवादी पक्षात सध्या मोठे वादळ उठले आहे. (NCP) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदालाच जाहीर आव्हान देण्यात आलं आहे. सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड ही अवैध असल्याचा दावा पक्षातील नेते सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. तशी नोटीसच त्यांनी सुनेत्रा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना पाठवली आहे. यावर आता सुनील तटकरे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

आलेल्या नोटिशीत तथ्य नाही. राष्ट्रीय अध्यक्षांसाठी बोलवण्यात आलेली तेव्हाची बैठक ही नियमानुसारच होती. आम्ही तरीही यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ. माहिती घेऊ आणि नंतरच कारवाई करु, असे सुनील तटकरे यांनी सांगितलं. तसंच, या नोटिशीची कायदेशीर वैधता तपासावी लागले. परंतु मला वैयक्तिकरित्या या नोटिशीत काही तथ्य आहे, असं वाटत नाही असंही ते म्हणाले.

सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह; नोटिशीमागे नेमकं डोकं कुणाचं ?

आम्ही एकत्रित बसून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी पक्ष एकसंघ आहे. आमच्या पक्षात लोकशाहीने काम चालते, असा ठाम विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, तटकरे यांनी राज्याच्या अर्थमंत्रिपदावरही भाष्य केलं. अर्थमंत्रिपद हे सध्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. परंतु, या पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडंच आहे. त्यामुळे हे खाते आम्हाला मिळावे, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे.

यावर बोलताना लवकच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. लवकरच आम्ही हा प्रश्न मार्गी लावू, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीमधून मंत्री नरहरी झिरवळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार असून धनंजय मुंडे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचीही चर्चा रंगली आहे.

follow us