Download App

आंबेडकर विरुद्ध वागळे वादात फडणवीसांची एंट्री

Nikhil Wagale, Sujat Aambedkar and Devendra Fadanvis :  ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून निखिल वागळे यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांनी आपली तक्रार दाखल केली होती. त्याची तातडीने दखल घेतल्याबद्दल निखिल वागळे यांनी ट्विट करत फडणवीसांचे आभार मानले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून निखिल वागळे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपूत्र सुजात आंबेडकर यांच्यामध्ये वादावादी झाली आहे. निखिल वागळे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करत अजित पवार हे भाजपसोबत जाणार असे म्हटले होते. यावर सुजात आंबेडकर यांनी निखिल वागळेंना टोला लगावला होता.

Ajit Pawar : कोणाच्या सोईने हा कार्यक्रम करण्यात आला, याची चौकशी करा अन्यथा…

निखील वागळे वर्षभर वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे,असे म्हणत होते. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण नेहमची भाजपला मदत करणारे असते. भाजपला हरवायचे असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीला साथ द्यावी असे म्हणत होते. आता म्हणतात अजित पवार भाजपमध्ये कधी जाणार, अप्रतिम पत्रकारिता. प्रथम ही बातमी ब्रेक केल्याबद्दल पत्रकारालाही सलाम, असे सुजात यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.

त्यावर संतप्त होत वागळे यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. ‘सुजात आंबेडकरविषयी माझं बरं मत होतं. पण, किती थिल्लर निघाल तो !’ असे ट्विट त्यांनी केले होते. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. त्यांनी निखिल वागळे यांना ट्विट करत धमकी दिल्याचा आरोप वागळेंनी आपल्या ट्विटरवरुन केला आहे.

Eknath Shinde यांनी बोलावली तात्काळ बैठक, मंत्र्यांनी सांगितलं कारण…

त्यानंतर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घेतली आहे. यावरुन निखिल वागळे यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. माझ्या तक्रारीची दखल तातडीने घेऊन पोलीस आयुक्तांना कारवाईच्या सूचना दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनःपूर्वक धन्यवाद, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच यानंतर सुजात आंबेडकरबरोबरचा वाद माझ्या बाजूने मी संपवतो आहे. धन्यवाद, असे वागळेंनी ट्विट केले आहे.

Tags

follow us