Eknath Shinde यांनी बोलावली तात्काळ बैठक, मंत्र्यांनी सांगितलं कारण…
CM Eknath Shinde Meeting : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना तात्काळ मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी एक वाजता ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये शिवसेनेचे मंत्री असणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या बाहेर असणारे सर्व मंत्री मुंबईत हजर होत आहेत.
या बैठकी मागील कारण काय? या बैठकीमध्ये काय होणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे या बैठकीमध्ये राज्याच्या राजकारणाबद्दल काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंबादास दानवे यांना हप्त्याचे रेट माहित कसे? ते त्यात आहेत का? संदीपान भुमरेंचा दानवेंना सवाल
काल रात्री हे आदेश मंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर सर्व मंत्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली की, मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण समिती संदर्भात बैठक बोलावली आहे. त्यासाठी बोलावण्यात आलं आहे. यामध्ये मराठा आरक्षण समितीच्या सर्व सदस्यांना दौरे रद्द करून मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले.