नांदेड : देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ झाली आहेत. आता मी जे बोलतोय ते विचार, भाषण लक्षात ठेवा. कारण या देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या ७५ पैकी ५४ वर्षे काँग्रेस आणि १६ वर्षे भाजपने सत्ता उपभोगली आहे. मात्र, या दोघांच्या सत्ता काळात काही फरक जाणवतो का, त्यांचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांनाच काय तो फायदा झाला आहे. बाकी या देशातील शेतकरी व इतर घटकांना काहीच फायदा झालेले नाही. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी ‘सत्तेची चावी आपल्या हातात हवी, ही एक गोष्ट लक्षात घेऊन आपलं मत दिले पाहिजे, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडच्या सभेत केले.
काही वर्षांपूर्वी एमआयएमचे ओवेसी यांनी नांदेड मार्गेच महाराष्ट्रात प्रवेश केला होता. पुढे झालेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने मोठे यश मिळवले होते. आता पुन्हा नांदेड मार्गे महाराष्ट्राच्या राजकारणात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे प्रवेश करत आहे. केवळ दोन महिन्यांतच के. सी. राव यांनी दुसरी सभा घेतली.
Uddhav Thackeray : बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष! – Letsupp
के. चंद्रशेखर राव म्हणाले की, देशातील आदिवासी, दलित समाज शतकांपासून त्रस्त आहेत. त्यांचा त्रास कमी झाला पाहिजे म्हणून तेलंगणा राज्यात आम्ही या वर्गातील लोकांना दहा लाख रुपये देत आहे. ते आम्ही परत घेत नाही. दलित बंधू ही योजना आम्ही लागू केलेली आहे. महाराष्ट्रात ही योजना लागू करावी. आम्ही महाराष्ट्रात येणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच चॅलेंज दिले.
देवेंद्र फडणवीस मला म्हणतात की तुमचे काम तेलंगणात आहे, इकडे काय करता. त्यांना मी सांगू इच्छितो की मी भारताचा नागरिक आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात मी जाऊ शकतो. मी महाराष्ट्रात येऊ नये असे वाटत असेल तर तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू करा, शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करा, शेतकऱ्यांना प्रकल्पातून मोफत पाणी आम्ही देतो, तसे तुम्ही द्याल का, कोणत्याही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याचा वारसांना पाच लाख रुपये द्यायला हवे ते तुम्ही द्याल का, जोपर्यंत तुम्ही ही कामे करणार नाही, तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात येत राहणार, असे ओपन चॅलेंज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी दिले.