Uddhav Thackeray : बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष!
मालेगाव : भाजपने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलयं. परवाच भाजप आमदार वाॅशिंग पावडर बद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं कसं हे सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही, असा तुफान हल्ला भाजपवर उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, एक तरी अशी घटना दाखवा मुख्यमंत्री झाल्यावर मी हिंदुत्व सोडले. जे माझे आजोबा वडील बोलायचे शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. तेच मी करतोय. अनिल देशमुखांच्या नातीची चौकशी, लालूप्रसाद यादवांच्या सुनेची बेशुद्ध होईस्तोवर चौकशी. हे तुमचे हिंदुत्व. आता उघडपणे बोलतात. आम्हाला शांत झोप लागते हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. गुजरातला आधी का गेले हे आता समजले काय धुतले माहिती नाही.
१५ दिवसांपूर्वी संजय कदम, अद्वय हिरे आले हे सभा सभारंभ पुरता असू नये. ही लढाई देशाची, शेतकऱ्यांची आहे. तुमची मला आवश्यकता आहे. श्रीकृष्णाने जसा गोवर्धन उचलला तसा लोकांनी पण हातभार लावला तसा तुम्ही पण हातभार लावा. रावण धनुष्य घेतांना उताणा पडला तिथे हे मिंधे कोण? मी तुमच्या सोबतीने लढायला उभा आहे, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.