अमरावतीत येत्या ५ ऑक्टोबरला होणाऱ्या (RSS) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला आपण प्रकृतीच्या कारणास्तव जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी अखेर स्पष्ट केले आहे. आपले वय आता ८४ झाले असल्याने प्रकृती बरी नाही, त्यामुळे आरएसएसच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही असे कमलताई गवई यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे.
हा सोहळ्याला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई या जाणार असल्याची एक निमंत्रण पत्रिका समाजमाध्यमातून व्हायरल होत होती. त्यानंतर आंबेडकरी अनुयायांच्या यावरुन नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर या कार्यक्रमाला आपण जाणार नाही असेही कमलताई गवई यांच्या हस्तलिखित पत्र व्हायरल होऊ लागले होते. त्यानंतर हे पत्र खोटे असून त्या या कार्यक्रमाला जाणारच आहेत असे सांगितले गेले होते. आता पुन्हा कमलताई गवई यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपण या कार्यक्रमला उपस्थित राहू शकणार नसल्याचं पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे.
RSS चे षडयंत्र मी आंबेडकरी, विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही; कमलताई गवईंचे स्पष्टीकरण
अमरावतीत ५ ऑक्टोबरला RSS चा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कमलताई गवई यांचे नाव समाविष्ठ असल्याची निमंत्रण पत्रिका समाजमाध्यमात व्हायरल केली जात होती. त्यानंतर आंबेडकरी समाजाकडून या संदर्भात टीका केली जात होती. अखेर आता कमलताई गवई यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. RSSच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कमलताई गवई यांचं नाव असल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावर कमलताई यांनी पत्राद्वारे आपले मत मांडले आहे.
माझं वय 84 असल्याने माझी प्रकृती बरी नाही, त्यामुळे आरएसएसच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. मी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले आहे, पण मला एका कार्यक्रमामुळे कलंकित करण्याचा प्रयत्न होत आहे. आपण या कार्यक्रमाला जरी गेलो असतो तरी तेथे आंबेडकरी विचारच मांडले असते असेही कमलताई गवई यांनी म्हटलं आहे.