Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat) 12 नगरसेवकांनी आपल्याच नगराध्यक्षांविरोधात बंड पुकारला होता. या नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठरावाचा अर्ज दाखल केला होता. तर नगराध्यक्षांनी अविश्वास ठरावाच्या बैठकीच्या दिवशी सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापती राम शिंदेंची (Ram Shinde) चाणक्यनिती यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
येत्या 2 मे रोजी कर्जत नगरपंचायतीत नव्या नगराध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पडणार असून या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी सभापती शिंदेंवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागले आहे. त्यामुळे कर्जत- जामखेड मधील राजकीय घमासाम अजूनही शमलेला नसल्याचे यातून दिसून येते.
संविधानिक पदाचा वापर राजकीय ताबेदारीसाठी – एका संविधानिक पदाचा वापर हा राजकीय ताबा व इतर पक्षातील लोकांना वळवण्यासाठी करत असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी सभापती राम शिंदे यांच्यावर आरोप केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले की, जसे राज्य पातळीवर दाबवतंत्र वापरून पक्ष फोडले त्याचप्रमाणे कर्जतमध्ये देखील करण्यात आले. या सरकारच्या काळामध्ये लोकशाहीला किंमत राहिलेली नाही. तुमच्याकडे आलेल्या पदाचा वापर लोकहिता ऐवजी राजकीय ताबा आणि इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी केला जात आहे. कर्जत जामखेडमध्ये पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी नाही त्यासाठी राम शिंदे सर कुठेही प्रयत्न करताना दिसत नसल्याचे यावी आमदार रोहित पवार यांनी माध्यमंशी बोलताना सांगितले.
पीडब्ल्यूडीच निधीविना कामे खोळंबली आमदार रोहित पवार यांनी यावेळी कर्जत जामखेड मधील सुरू असलेल्या विकास कामांवर देखील भाष्य केले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या विकासकामांना निधी नसल्याने कामे खोळंबल्याचे आ. पवार यांनी सांगितले.
Abir Gulal Ban In India : पाकिस्तानी अभिनेता फवादच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर केंद्रानं लादली बंदी
अहिल्यानगर जिल्ह्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा 650 ते 700 कोटींचा फंड अडकला आहे. तर सरकारकडून मात्र दहा ते वीस कोटींचा निधी प्राप्त होतो यासाठी सभापती राम शिंदे सर प्रयत्न करताना कुठेही दिसून येत नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी सभापती शिंदेंवर केला आहे.