सुप्रिया ताईचं पवार कुटुंब एकत्र आणू शकतात…रोहित पवारांचे सूचक विधान

सुप्रिया ताईचं पवार कुटुंब एकत्र आणू शकतात…रोहित पवारांचे सूचक विधान

Rohit Pawar On Will Sharad Pawar and Ajit Pawar come together : राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांप्रमाणे कुटुंबांमध्ये देखील फूट पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच नुकतेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. असं असतानाच आता पवार कुटुंब एकत्र येणार का? यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबाने एकत्र राहिले पाहिजे, ही शिकवण आपली भारतीय संस्कृती देत असते. पवार कुटुंब हे एकच आहे. मात्र, काहीसे मतभेद असतील मात्र एकत्र येण्याचा निर्णय हा अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह शरद पवार यांनी (Sharad Pawar) एकत्रपणे घेतला पाहिजे. तसेच या दोघांना एकत्र आणण्यासाठी सुप्रिया ताई या मध्यस्थी करू शकतात, असे सूचक विधान यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे.

कर्जत – जामखेड मतदार संघातील अनेक प्रश्नणासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे नगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. यावेळी जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी (Maharashtra Politics) संवाद साधला. राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मतभेद होऊन दुरावलेले ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा राजकारणात रंगत आहे. याचप्रमाणे पवार कुटुंब एकत्र येणार का? असा प्रश्न पवार यांना करण्यात आला. यावर प्रतिक्रया देत रोहित पवार यांनी एक सूचक विधान केले.

कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय! उबाठा गटाच्या बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याचा आरोप, बीडमध्ये खळबळ…

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, राजकीय दृष्टिकोनातून मी काही बोलणार नाही. मात्र परिवाराच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून विचार केला असता आपली भारतीय संस्कृती आपल्याला एकत्र (Pawar Family) राहण्याचे शिकवते. भारतीय संस्कृती असो किंवा पवार कुटुंबाविषयी बोलायचे झाले, तर पवार कुटुंब एकच आहे. मात्र जो, काही थोडेफार मतभेद असतील तर मिटावे, अशी इच्छा यावेळी आमदार रोहित पवार पवार यांनी व्यक्त केली.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, पवार कुटुंबांनी अधिक ताकदीने एकत्र आले पाहिजे, अशी आमची व्यक्तिगत इच्छा आहे. मात्र, राजकीय दृष्टिकोनातून आपण विचार केला तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार आणि आज दुसऱ्या पक्षाचे नेते असलेले अजित पवार यांनी एकत्र येत निर्णय घेण्याची गरज आहे. जर या गोष्टी कोणी मध्यस्थी करू शकत असेल, तर ते म्हणजे आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे या आहेत. म्हणूनच या तिघांमध्ये भविष्यात एकत्र येण्याबाबत काय निर्णय होईल, यावर आज तर भाष्य करता येणार नाही. मात्र येणाऱ्या काळात ते तिघेच एकत्र येणाबाबतची भूमिका स्पष्ट करू शकतात, असे यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले.

Pahalgam Attack : ‘हिंदू आहे सांगताच, अतिरेक्यांनी गोळी झाडली…’ अतुल मोनेंच्या कुटुंबियांनी सांगितला थरार

शिवसेनेमध्ये ठाकरे बंधूंमध्ये वाद झाल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसे या पक्षाशी स्थापन केली होती. मात्र काही दिवसापूर्वी दोघे बंधू म्हणजेच ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा आहे. आता त्यापाठोपाठ काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेत शरद पवारांच्या नेतृत्वातून बाहेर पडणे पसंत केले होते. यामुळे राष्ट्रवादीमध्ये देखील शरद पवार गट आणि अजित पवार गट तयार झाला. यामुळे आजच्या राजकीय परिस्तिथी पाहता ठाकरे कुटुंब एकत्र येणार असं बोललं जात आहे. तर येणाऱ्या काळात पवार कुटुंब देखील एकत्र येईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube