कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय! उबाठा गटाच्या बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याचा आरोप, बीडमध्ये खळबळ…

Prostitution Business Under Name Of Kala Kendra In Kaij Taluka : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुन्हेगारीचं माहेरघर अशी बीडची (Beed) ओळख झाली आहे. जणू काही बीड अन् गुन्हेगारी हे नवीन समीकरणचं जणू निर्माण झालंय. गुन्हेगारी, मारहाण, अपहरण या घटना काही बीडला (Beed Crime) नवीन नाहीत. अशातच पुन्हा आता बीडमधून एका धक्कादायक बाब समोर आलीय. केज तालुक्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय (Prostitution) सुरू असल्याचा प्रकार उघड झालाय. या कला केंद्रावर (Kala Kendra) ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याचा आरोप केला जातोय, अशी तक्रार पोलिसांत दिली गेली होती.
बीड जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालू होते. त्याचे पुरावे मी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. तेथे धाड टाकण्याची विनंतरी केली होती, असं तक्रारदाराने म्हटलंय. उबाटा गटाच्या रत्नाकर शिंदे ह्यांचे हे कला केंद्र असल्याचा दावा केला (Beed Crime) जातोय. जुलै 2023 ला देखील या कलाकेंद्रावर पोलिसांची रेड झाली होती. काल 23 एप्रिलच्या मध्यरात्री बीड पोलिसांनी केज तालुक्यातील उमरी शिवारात असलेल्या महालक्ष्मी कला केंद्रावर छापा टाकला.
यंदाच्या अण्णाभाऊ साठे साहित्याभूषण पुरस्काराचे ‘विक्रम शिंदे’ ठरले मानकरी! कमी वयात भरीव योगदान…
या छापेमारी दरम्यान, सदर प्रतिष्ठानाचा व्यवस्थापक कला केंद्रात काम करणाऱ्या (Beed News) महिलांना अनैतिक कृत्यांमध्ये गुंतवून वेश्याव्यवसायाला चालना देण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे आढळून आले. परिणामी, सदर आस्थापनेच्या परिसरातून 10 महिलांची सुटका करण्यात आली.
त्यानुसार, राज्याच्या वतीने अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA), कलम 3, 4, 5 आणि 6, तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 143 अंतर्गत कला केंद्राच्या मालकाविरुद्ध, मालकाचा मुलगा (जो प्रतिष्ठान चालवत होता) आणि संबंधित व्यवस्थापकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. कठोर कलमे लावली गेली आहेत. त्यात सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करणार आहेत.
Video : कपाळाच्या टिकल्या काढल्या अन् ‘अल्ला हू अकबर’ म्हटलं पण..पवारांना सांगितली आपबिती…
केज तालुक्यातील उमरी येथे महालक्ष्मी कला केंद्र चालवले जाते. या कला केंद्रामध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. यानुसार पोलीसांनी काल मध्यरात्री या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी येथे अनेक रुममध्ये पार्टी नृत्य सुरू असल्याचं दिसून आलं. याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे.