Download App

जी तुम्ही घाण केली त्यामुळं बीड जिल्ह्याची बदनामी; करूणा मुंडे-शर्मा यांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे शर्मा यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

  • Written By: Last Updated:

Karuna Munde Sharma on Dhananjay Munde : माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे  (Munde)यांच्या पत्नी करूणा मुंडे शर्मा यांनी पुन्हा एकदा मुंडेंवर जोरदार निशाणा साधलाय. तुम्ही मला बदनाम करत असताना जिल्ह्लायाल का केलं असं म्हणालात. मात्र, तुम्हीच जिल्हात घाण केली आहे असा थेट घणागात करूणा यांनी मुंडेंवर केला आहे.

धनंजय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होता. डोळ्यावर चष्मा घातला होता. कारण लोकांच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नाहीत. जी तुम्ही घाण केली त्याची उत्तरं तुमच्याकडे नाही. म्हणून तुम्ही गप्प होतात. जनतेच्या डोळ्यात डोळे घालण्याची तुमची लायकी नाही, असं म्हणत करूणा शर्मांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

धनंजय मुंडेंना मोठा धक्का! करूणा शर्मांना 2 लाखांची पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम

पुढे त्या असेही म्हणाल्या की, मुंडे म्हणताय जिल्ह्याची बदनामी करू नका, तर जिल्ह्याची बदनामी तुमच्यामुळेच झाली आहे. तुमच्या कारनाम्यामुळे झाली आहे. गेली अनेक दिवसांपासून करूणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत आलेल्या आहेत. त्यांनी आताही धनंजय मुंडे यांच्यावरच आरोप केले आहेत.

बीड जिल्ह्याची बदनामी ज्यांनी कोणी केली, भलेही तो बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? असा सवाल धनंजय मुंडेंनी विरोधकांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

follow us