केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांना मोठा धक्का; सिया अन् चेतनला न्यायालयीन कोठडी

Ketan Agrawal Case : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांना मोठा धक्का बसला असून या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींना

Ketan Agrawal Case

Ketan Agrawal Case

Ketan Agrawal Case : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांना मोठा धक्का बसला असून या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले आहे.

या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज झालेल्या सुनावणीत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

18 जुन रोजी केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने (Chetan Chaudhary) लोहगडच्या किल्ल्यावरून केतनची दरीत ढकलून हत्या केली होती. सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र यानंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन या प्रकरणाचा सखोल तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे.  केतनला टक्कल असल्याने तो केसाचा विग वापरत होता तसेच बोलताना अडखळत होता म्हणून सियाला केतनसोबत लग्न मान्य नव्हते अशी देखील माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती केली आहे.

प्रकरण काय?

व्यावसायिक केतन अग्रवाल आणि सिया गोयल पुढील महिन्यात लग्न करणार होते मात्र सियाचा चेतन चौधरीसबोत प्रेम प्रकरण सुरु असल्याने सियाला केतनसोबत लग्न मान्य नव्हते. त्यामुळे केतनचा काटा काढण्यासाठी सिया आणि चेतनने कट रचला आणि लोहगडच्या किल्ल्यावर 18 जून रोजी केतनला दरीत ढकलून त्यांची हत्या केली. सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करत आरोपींना अटक केली.

पुढील 3 दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी

Exit mobile version