केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा खटला सुरू; सिया-चेतनच्या जामीन अर्जांवर 17 नोव्हेंबरला सुनावणी

Ujjwal Nikam on Ketan Agrawal Murder Case; केतन अग्रवाल याची हत्या केल्याच्या आरोपातील खटल्याला आज मावळमधील वडगाव न्यायालयात सुरुवात झाली.

Ujjwal Nikam on Ketan Agrawal Murder Case

Ujjwal Nikam on Ketan Agrawal Murder Case

Ujjwal Nikam on Ketan Agrawal Murder Case: लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून केतन अग्रवाल याची हत्या केल्याच्या आरोपातील खटल्याला आज मावळमधील वडगाव न्यायालयात सुरुवात झाली. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी आरोपींच्या वतीने दोन जामीन अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतरच जामिनावर निर्णय घ्यावा, अशी भूमिका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडली. त्यामुळे या अर्जांवरील निर्णयासाठी आता 17 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

2019 नंतर काहींचे फोन थांबले ते थांबलेच; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

आजच्या सुनावणीला सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) हे दोन्ही आरोपी ऑनलाइन उपस्थित होते. सरकारी पक्षाने खटल्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केल्यानंतर न्यायालयात आरोपींवरील आरोप निश्चित करण्याची कार्यवाही सुरू झाली. याचवेळी आरोपींच्या वकिलांनी दोन जामीन अर्ज दाखल केले.

या अर्जांवर तातडीने विचार करण्याऐवजी सरकारी पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला केली. त्यामुळे दोन्ही जामीन अर्जांवर पुढील सुनावणीदरम्यान विचार होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील तिसरा सहआरोपी रितेश हंगे याच्याकडे अद्याप वकील नसल्याचा मुद्दाही न्यायालयात उपस्थित करण्यात आला. त्याला स्वतःचा वकील नेमण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी निकम यांनी केली. त्याने वकील नेमला नाही, तर न्यायालयाकडून त्याला कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेबांनी संजय राऊतांना मुलाखतीतच दिल्या शिव्या! राज ठाकरेंचा मोठा खुलासा

आता 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत आरोपींच्या जामीन अर्जांवर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

18 जूनला लोहगडावर नेमकं काय घडलं?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपांमुळे एक प्रेमसंबंध, लग्नाची तयारी आणि त्यानंतर घडलेली धक्कादायक घटना चर्चेत आली. केतनचे सिया गोयलसोबत लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंबांकडून नोव्हेंबरमध्ये उदयपूर येथे विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती. त्याआधी 19 फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडाही झाला होता.

मात्र, पोलिसांच्या तपासानुसार या प्रकरणामागे वेगळेच कारस्थान असल्याच उघड झालं. 18 जून रोजी सिया केतनला ट्रेकिंगच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. तपासातील माहितीनुसार, तिने त्याला किल्ल्यावरील कमी वर्दळ असलेल्या आणि दरीच्या कड्याजवळील ठिकाणी नेले.

‘मोदी माझे व्यक्तिगत शत्रू आहेत का?’ संजय राऊतांच्या वक्तव्याने ‘बोध कीर्तन’ची चर्चा

तेथे सियाने केतनला बोलण्यात गुंतवून ठेवलं. त्याचवेळी चेतन चौधरी जवळच दबा धरून असल्याचा आरोप आहे. केतन तिच्याशी संवाद साधण्यात व्यस्त असताना चेतन मागून आला आणि त्याने केतनला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

हा प्रकार पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर गंभीर आरोप असून, आता न्यायालयीन खटल्याला सुरुवात झाली आहे. 17 नोव्हेंबरच्या सुनावणीत जामीन अर्जांवर होणारा निर्णय आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

Exit mobile version