जाणून घ्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल Ramesh Bais यांच्याविषयी

महाराष्ट्राच्या राज्यपाल ( Maharashtra Governer )  पदी  रमेश बैस ( Ramesh Bais )  यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बैस हे झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते. रमेश बैस यांचा गेल्या काही दिवसांपासून झारखंड सरकारसोबत संघर्ष सुरू होता. झारखंड ( Zarkhand )  येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे सरकार राज्यामध्ये अस्तित्वात आहे. राष्ट्रपतींनी देशातील तेरा […]

Untitled Design (27)

Untitled Design (27)

महाराष्ट्राच्या राज्यपाल ( Maharashtra Governer )  पदी  रमेश बैस ( Ramesh Bais )  यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बैस हे झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते. रमेश बैस यांचा गेल्या काही दिवसांपासून झारखंड सरकारसोबत संघर्ष सुरू होता. झारखंड ( Zarkhand )  येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे सरकार राज्यामध्ये अस्तित्वात आहे. राष्ट्रपतींनी देशातील तेरा राज्यपाल बदलले आहेत. त्यातच भागतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला असून बैस  यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

रमेश बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत.  यापूर्वी 2019 मध्ये त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. आतापर्यंतचे ते सात वेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले आहेत. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनराज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. बैस यांचा जन्म तेव्हा मध्य प्रदेश मध्ये असलेल्या रायपूर येथे झाला आहे. रायपुर हे आता छत्तीसगडमध्ये आहे.  याचबरोबर त्यांनी मध्य प्रदेश येथे भाजपाचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे.

दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेरा राज्यपालांची नियुक्ती केलेली आहे. त्यात रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांविषयी आक्षेपार्ह  विधान केले होते. त्यामुळे कोशारी यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्रात विरोधकांकडून केली जात होती.  तसेच कोश्यारी  यांनी आपला राजीनामा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देखील सुपूर्द केला होता.  तब्येत साथ देत नसल्यामुळे त्यांनी राजीनामा मंजूर करण्याची मोदींना  विनंती केली होती.

Exit mobile version