मुंबई -दिल्लीचं अंतर 12 तासांचं, पंतप्रधान मोदी आज करणार महामार्गाचं उद्घाटन
दिल्ली : मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाच्या (Mumbai-Delhi Expressway)पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महामार्गाचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर या महामार्गाची जोरदार चर्चा सुरु आहे. आज रविवारी (दि.12) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या मार्गातील सोहना-दौसा या पहिल्या टप्प्याचं लोकर्पण करणार आहेत. यामुळं दिल्ली ते जयपूर अंतर केवळ दोन तासांत पूर्ण करता येणार आहे. या माध्यमातून भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवले आहे.
केंद्र सरकारच्या (Central Government) मुख्य प्रकल्पांमध्ये समाविष्ट असलेल्या दिल्ली मुंबई-एक्स्प्रेस वेच्या (Delhi-Mumbai Expressway) पहिल्या टप्प्याचं (246 किमी) काम पूर्ण झालंय. त्यासाठी सुमारे 12,150 कोटी रुपये खर्च आला आहे. याचं काम पूर्ण झाल्यानंतर हा एक्स्प्रेस वे देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे बनणार आहे.
या एक्स्प्रेस वेची लांबी 1,386 किलोमीटर असणार आहे. हे काम पूर्णपणे तयार झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई (Mumbai) हे अंतर 1,242 किलोमीटर होईल, जे आता 1424 किमी आहे. सध्या हा द्रुतगती मार्ग 8 लेनमध्ये तयार करण्यात येत आहे. भविष्यात तो 12 लेनचा बनवता येणार आहे. जनावरांना रस्ता ओलांडण्यासाठी या एक्स्प्रेस वेमध्ये (Delhi-Mumbai Expressway) अॅनिमल पास बनवले जाणार आहेत, त्यामुळं जनावरांमुळं होणारे अपघात टाळता येणार आहेत.
Kasba Chinchwad By Election : एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाकडून बंदी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिल्ली (Delhi) मुंबई (Mumbai) एक्सप्रेस वेचा व्हिडीओ पोस्ट केला, लाखो लोकांनी हा व्हिडीओ (Video) पाहिला. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनीदेखील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिलीय. रिट्विट करत त्यांनी लिहिलंय की, तुम्ही आम्हाला आठवण करून देत आहात की इन्फ्रास्ट्रक्चर बोरिंग नाही, तर ही एक जादूही असू शकते.