Kasba Chinchwad By Election : एक्झ‍िट पोलवर निवडणूक आयोगाकडून बंदी

Kasba Chinchwad By Election : एक्झ‍िट पोलवर निवडणूक आयोगाकडून बंदी

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India)215- कसबा (Kasba) व 205 – चिंचवड (chinchwad)विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा तसेच देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम 18 जानेवारी 2023 रोजी जाहीर केला आहे.

त्यामुळं 16 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सकाळी सात वाजेपासून 27 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे अप्पर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 126 (1) (ब) अन्वये, असे करण्यास प्रतिबंध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे.

कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास

येत्या 26 फेब्रुवारी रोजी या दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदान होईल तर दोन मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे. या दोन्ही जागी भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube