“आम्ही कोकण भूमी वाचवायची सुपारी घेतली आहे. आम्ही नाणार परिसरातील निरपराध नागरिकांच्या जीवनाचं रक्षण करण्याची सुपारी घेतली आहे. तुमचे पोलीस ज्या प्रकारे लोकांना मारहाण करत आहे. त्यापासून त्यांना वाचवण्याची सुपारी आम्ही घेतली आहे. अशा हजार सुपाऱ्या घेतल्या आहेत.” असं उत्तर शिवसेना खासदार (ठाकरे गट) विनायक राऊत यांनी केली आहे.
उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस काल बोलताना म्हणाले होते की बारसूला विरोध करणाऱ्यांनी सुपारी घेतली आहे. त्यावर विनायक राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं. त्यावेळी ते म्हणाले की होय आम्ही सुपारी घेतली आहे. पण आम्ही कोकण भूमी वाचवायची सुपारी घेतली आहे.”
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की देवेंद्रजी काल जेव्हा तुम्ही बोलताना सरकारच्या तीन कंपन्यांसोबत अरम्पकोचं नाव विसरला. तुम्हाला अरम्पकोच्या अदानीना आणायचं आहे का ? यात या प्रकल्पाचं गुपित लपलं आहे. तुम्ही अदानीची सुपारी घेतली असेल तुम्ही अरम्पकोची सुपारी घेतली असेल अशी टिक देखील त्यांनी यावेळी केली.
Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…
काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे. न्यायालयाचा निर्णय आला की हे सरकार गडगडणार आहे, त्यामुळे शेवटचा हात मारण्यासाठी हा प्रकल्प केला जात आहे. अशी टीका देखील विनायक राऊत यांनी यावेळी केली.
स्थानिक आंदोलकांच्य प्रश्नांवर बोलताना राऊत म्हणाले की, स्थानिक नागरिकांचे जोपर्यंत प्रश्न आहेत. त्यांच्या अडचणी जोपर्यत सोडवल्या जात नाहीत. तोपर्यंत शिवसेना ठाकरे गट स्थानिक नागरिकांच्या पाठीशी उभी राहील. सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसी येत आहेत पण अशा पोलिसांच्या नोटिसी आल्या तरी आम्ही त्याला किंमत देत नाही.
Rajan Salvi : ‘प्रकल्पाला समर्थनच….’; रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाच्या आमदाराचा पाठिंबा
दरम्यान विरोधी पक्षाकडून यांच्यावर टीका केली जात असताना सत्ताधारी पक्षाकडून मात्र यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आज सकाळी उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता बारसू रिफायनरीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक लोकांच्या विरोधामुळे बारसूचा प्रश्न गंभीर झाला आहे. ज्या प्रक्रारे पोलीस आणि स्थानिक हे आमने-सामने आले, त्यामुळे सरकारवर टीका करण्यात आली. पण या प्रकरणात आता शरद पवार यांची एंट्री झाली आहे. उदय सामंत यांच्याशी भेट झाल्यानंतर बारसू रिफायनरी संदर्भात सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पवार यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे.