Chatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेच्या (Chatrapati Shivaji Maharaj Statue) पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलीयं. जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी तर चेतन पाटीलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीयं. या दोघांचीही सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मी कोणाला सांगू, काश्मीरला जाताना माझी…, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा धक्कादायक विधान
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीवरुन ठेकेदार जयदीप आपटे आणि तांत्रिक सल्लागार चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून जयदीप फरार होता. अखेर जयदीपला त्याच्या कल्याणमधील घरातून पोलिसांनी अटक केलीयं. जयदीपच्या शोधासाठी पोलिसांचं 7 पथकांकडून शोध मोहिम सुरु होती, अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
“मी राष्ट्रवादीतच, नड्डांनी गळ्यात मफलर टाकला होता पण..”, भाजपप्रवेशाला नाथाभाऊंचा फुलस्टॉप!
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीका केली . यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत. चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाइन करणाऱ्या चेतन पाटील याला ताब्यात घेतले होते. पुतळ्याप्रकरणी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटीलच्या कोल्हापुरातील घरी जाऊन पोलिसांनी चौकशीही केली होती. त्यानंतर पोलिसांनी चेतन पाटीलला ताब्यात घेतलं होतं.