मोठा निर्णय! निवडणुका संपताच मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपीला जामीन मंजूर

  • Written By: Published:
मोठा निर्णय! निवडणुका संपताच मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपीला जामीन मंजूर

Chetan Patil get bail From Mumbai HC: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळ्याप्रकरणी चेतन पाटील (Chetan Patil) सह जयदीप आपटेला (Jaideep Apte) अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने चेतन पाटीलला दिलासा दिला. चेतन पाटील याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर जयदीप आपटे अद्यापही तुरुंगात आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपीला जामीन मंजूर, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 

मालवण पुतळा दर्घटनेतील आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना आज मुंबई कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने चेतन पाटीलला जामीन मंजूर केला. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात सल्लागार असलेल्या चेतन पाटीलला अटक करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिली अनावरण केल्याच्या जवळपास नऊ महिन्यानंतर शिवरायांचा पुतळा कोसळला होता. पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर जयदीप आपटेलाही अटक करण्यात आली होती.

Video : मोठी बातमी! पाकिस्तानात पुन्हा दहशतवादी हल्ला, 38 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी 

दोन्ही आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता. त्यामुळे दोघांनीही जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, याप्रकरणी आज सुनावणी झाली.

चेतन पाटीलला 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटे याच्या जामीन अर्जावर सोमवारी (25 नोव्हेंबर) रोजी सुनावणी होणार आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube