Jaywant Sugars : ‘जयवंत शुगर्स’च्या 14 व्या गळीत हंगामास उत्साहात प्रारंभ
Jaywant Sugars : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर (Jaywant Sugars) कारखान्याच्या 14 व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, गौरवी भोसले, विनायक भोसले, ‘जयवंत शुगर्स’चे चेअरमन चंद्रकांत देसाई यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी चेअरमन चंद्रकांत देसाई व त्यांच्या पत्नी सौ. चंद्रशिला देसाई यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते वजनकाटा व गव्हाणपूजन करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय साळुंखे, विश्वासराव काळभोर, धनंजय घाडगे, नंदकुमार काळभोर, सुरेश जाधव, सत्यजित काळभोर, ‘जयवंत शुगर्स’चे जनरल मॅनेजर एन. एम. बंडगर, डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) व्ही. आर. सावरीकर, जनरल मॅनेजर (टेक्निकल) आर. आर. इजाते, चिफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, केन मॅनेजर नाथाजी कदम
मोठी बातमी! पाकिस्तानात पुन्हा दहशतवादी हल्ला, 38 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, डिस्टीलरी इनचार्ज व्ही. जी. म्हसवडे, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, इ.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, एच. आर. मॅनेजर एस. एच. भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, सेफ्टी ऑफिसर एस. व्ही. शिद, केनयार्ड सुपरवायझर एस. एम. सोमदे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बहुप्रतीक्षित ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला; महायुती की महाविकास आघाडी कुणाला धक्का?