Download App

Video: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पूल कोसळला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Chiplun Bridge Collapse: कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Expressway) चिपळूण येथे बांधण्यात येत असलेल्या सर्वात लांब उड्डाणपुलाच्या (Chiplun Bridge Collapse) कामाला नुकतीच गती आली असताना सोमवारी सकाळी 8.30 वाजता या उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेले दोन गर्डर (girders) अचानक तुटले. ते कोसळ्यावर मोठा आवाज झाला. मात्र त्यानंतर दुपारी उड्डाण पूलाचा आणखी काही भाग कोसळला आहे. उड्डाणपुलाचे गर्डर तुटल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणाही कोलमडली आहे.

पावसाळ्यापूर्वी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पावसाळ्यापूर्वी उड्डाणपुलावरील किमान एकेरी वाहतूक खुली करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आजपर्यंत त्यात यश आलेले दिसत नाही. उड्डाणपुलावर अद्याप एकेरी वाहतूक पूर्णपणे सुरू झालेली नाही. मात्र चिपळूण परिसरातील उड्डाणपुलाच्या कामात गेल्या महिनाभरात प्रगती दिसून आली. विशेष म्हणजे शहरातील बहादूरशेख कालव्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला आहे.

Pune : भिडेवाडा स्मारक प्रश्न सुटला; हायकोर्टातील खटला मनपा, राज्य सरकारने जिंकला

सुरुवातीला अनेक समस्या आल्या
शहरातून जाणाऱ्या 1.85 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाच्या बांधकामात सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पुलाचे 46 खांब उभारल्यानंतर लगेचच गर्डर उभारणीचे काम सुरू झाले. बहादूरशेख पूल ते वशिष्ठ पूल दरम्यान गर्डरचे कामही पूर्ण झाले आहे. यानंतर मुख्य ब्लॉकच्या अवघड टप्प्याचे काम सुरू करण्यात आले. वाशिष्ठी पुलाच्या दिशेने उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. एकूण 46 खांब आहेत, त्यापैकी 6 पूर्णपणे तयार आहेत.

आरोप खरेच; बिंधास्त नोटीस पाठवा! अजितदादांच्या गटातील नेत्यांना बोरवणकरांचे चॅलेंज

उड्डाणपुलाचे काम थांबले
सोमवारी पाचव्या खांबाजवळ मोठा आवाज झाला. त्यावेळी अनेकांनी तेथून पळ काढला. पुलाच्या आजूबाजूच्या दुकानातील लोक आणि इतर व्यापाऱ्यांनीही या ठिकाणापासून दूर ठेवले. जागेवर काम करणारे मजूरही येथून बाजूला झाले. सध्या या पुलावर काम करणाऱ्या कामगारांना पूर्णपणे हटवण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम बंद करण्यात आले आहे.

Tags

follow us