Pune : भिडेवाडा स्मारक प्रश्न सुटला; हायकोर्टातील खटला मनपा, राज्य सरकारने जिंकला

Pune : भिडेवाडा स्मारक प्रश्न सुटला; हायकोर्टातील खटला मनपा, राज्य सरकारने जिंकला

पुणे : येथील ऐतिहासिक भिडे वाड्याच्या स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भिडे वाड्याशी संबंधित उच्च न्यायालयातील प्रलंबित खटला महापालिकेने आणि राज्य सरकारने जिंकला असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. स्मारक करण्याचा प्रश्न सुटला असून तातडीने काम सुरू करणार अशी माहितीही पाटील यांनी दिली आहे. (municipal corporation and the state government won the pending Supreme Court case related to Bhide Wada)

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

अभिनंदन पुणेकर! पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. शासनाकडून निधीची तरतूद झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भिडेवाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात माहिती दिली होती.

तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही केली होती. त्यानुसार महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात शासनाची प्रभावी भूमिका मांडल्याने उच्च न्यायालयाने ही भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. लवकरच आता भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर होईल, याबद्दल सर्व पुणेकरांचे अभिनंदन, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube