Download App

चिपळूण राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या तिघांना अटक, 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखल

  • Written By: Last Updated:

Jadhav vs Rane : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच चिपळूणमधील (Chiplun) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दगडफेकीनंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल (दि. १७ फेब्रुवारी) रोजी जोरदार राडा झाला होता. पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. आता या सर्व प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी चिपळूण पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तिघांना अटक केली, तर ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल केलेत.

हायहोल्टेज ड्रामा तरीही सुषमा अंधारेंचा कार्यक्रम यशस्वी; बार रुममध्ये वकिलांशी संवाद… 

शुक्रवारी (दि. 17) चिपळूणमध्ये भाजप नेते निलेश राणे आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. चिपळूणमध्ये राणेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकी प्रकरणी ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यामध्ये ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांचा समावेश आहे. शहनवाज शिराळकर, फैयाज शिराळकर, हेमंत मोरे, अशी अटक झालेल्यांची आहेत. याशिवाय, ३०० ते ४०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबबत पोलीस हवालदार प्रशांत वामन चव्हाण यांनी फिर्याद नोंदवली आहे.

सोरेन सरकारच्या अडचणी वाढल्या, कॉंग्रेसचे १२ आमदार नाराज, ‘काँग्रेसचे मंत्र्यांना बदलवा, अन्यथा…’ 

याप्रकरणी काल रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत. सरकारी कामात अडथळा, दोन गटात हाणामारी केल्याप्रकरणी हे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 143, 145, 147,149,160,337,353,504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा सगळा प्रकार घडण्यापूर्वीच पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नोटीस बजावली होती. यामध्ये ठाकरे गटासह भाजपच्या नेत्यांनाही नोटीसा बजावल्या होत्या. यात भाजपचे तालुका प्रमुख वसंत ताम्हणकर, शहर प्रमुख परिमल भोसले यांना नोटीस बजावली होती.

नेमका वाद काय?
उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्यात आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे नेपाळी असल्याचे जाधव म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले होते की, भास्कर जाधवला चोप देणार, मी असं कोणाला सोडत नाही. दरम्यान, काल राणे कुटुंबीय आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद वाढला. राणेंवरही दगडफेक करण्यात आली होती. यानंतर राणे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सध्या भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील कार्यालयाबाहेर आणि घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

follow us