सोरेन सरकारच्या अडचणी वाढल्या, कॉंग्रेसचे १२ आमदार नाराज, ‘काँग्रेसचे मंत्र्यांना बदलवा, अन्यथा…’

  • Written By: Published:
सोरेन सरकारच्या अडचणी वाढल्या, कॉंग्रेसचे १२ आमदार नाराज, ‘काँग्रेसचे मंत्र्यांना बदलवा, अन्यथा…’

Jharkhand News : झारखंडमध्ये नव्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसचे 12 आमदार नाराज झाले आहेत. राज्यातील चंपाई सोरे (Champai Soren) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताच काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. चंपाई सोरेन सरकारमधील मंत्रीपदावरून झारखंड काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण होत आहेत.

सरकार, कायदेमंडळ अन् आता न्यायालयानेही ‘हात वर’ केले… धनगर आरक्षण प्रश्नाचा पूर्ण इतिहास! 

माहितीनुसार, मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांना मंत्रिपद दिल्याने काँग्रेसचे 12 आमदार नाराज आहेत.त्यामुळं चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड सरकार अडचणीत सापडलं आहे. ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांच्याकडे राज्याची सूत्रे आली आहेत. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकार टिवण्याचं मोठं आव्हान चंपाई सोरेन यांच्यापुढं आहे.

बारामती लोकसभा : सुनेत्रा पवार लढणारच… म्हणूनच अजितदादा भावनिक झाले आहेत! 

झारखंडमधील 17 पैकी 12 काँग्रेस आमदारांची आज रांचीमध्ये गुप्त बैठक झाली. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या चार मंत्रिपदावरील व्यक्तींना बदललं नाहीतर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच आम्ही राज्य सोडून बाहेर जाऊ, असा इशारा काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांनी दिला आहे. नाराज असलेले काँग्रेस आमदार नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील अशीही शक्यता आहे. त्याआधीच चंपाई सोरेन दिल्लीला रवाना झाले आहेत आणि त्यांच्यासोबत जेएमएमचे ज्येष्ठ नेते विनोद कुमार पांडे, सुप्रियो भट्टाचार्य आणि आमदार सदिव्य कुमार सोनू आहेत.

काँग्रेसचे मंत्र्यांना बदलून अन्य आमदारांना संधी द्यावी, अशी या नाराज आमदारांची मागणी आहे. या मुद्द्यावरून सरकारवर नाराज असलेले काँग्रेसचे १२ आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जयपूर किंवा बेंगळुरूला जाऊ शकतात.

दरम्यान, काँग्रेस आमदारांच्या नाराजीनंतर निर्माण झालेल्या अडचणींमधून मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि काँग्रेस नेतृत्व कसा मार्ग काढतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

जेएमएमचे आमदारही नाराज

दुसरीकडे जेएमएम आमदार बैद्यनाथ रामही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत. ते म्हणाले- ”मुख्यमंत्र्यांनी त्यांना घरी बोलावून सांगितले की काँग्रेसचा खूप दबाव आहे. शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या दबावामुळे माझा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. माझे नाव राजभवनात गेले होते. माझा अपमान झाला आहे. मी लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतो, जो धक्कादायक असेल.

झारखंडमध्ये किती मंत्री असू शकतात?

घटनात्मक तरतुदींनुसार झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 12 मंत्री असू शकतात. यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील JMM, काँग्रेस आणि RJD युती सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. 81 सदस्यांच्या विधानसभेत 47 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर 29 आमदारांनी विरोध केला.

कोणाकडे किती आमदार आहेत?

झारखंड विधानसभेत आघाडी पक्षांचे 47 आमदार आहेत. जेएमएनकडे 29, काँग्रेसकडे 17 आणि आरजेडीकडे 1 आमदार आहे. त्याच वेळी भाजपकडे 26 आमदार आहेत आणि AJSU पक्षाकडे तीन आमदार आहेत. दोन अपक्ष आमदारांव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय (एमएल) यांचा प्रत्येकी एक आमदार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube