कोंबडी चोर ते नेपाळी वॉचमनचं पोरं…; राणे अन् भास्कर जाधवांच्या वादाची वात कुठून पेटली
कणकवली : गुहागर येथे 16 फेब्रुवारीला भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या सभेपूर्वी चिपळूण येथे मोठा राडा झाला. या राड्याचे रूपांतर थेट राणें यांच्या गाडीवर दगडफेक करण्यापर्यंत पोहचले आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला शाब्दीक वाद थेट हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचला. आता निलेश राणे आणि भास्कर जाधवांचा (Bhaskar Jadhav) वाद नेमका काय? या दोन्ही नेत्यांमधील वादाची वात नेमकी कुठून पेटली हे आपण जाणून घेणार आहोत. (What IS The Issue Between Bhaskar Jadhav & Narayan Rane Family)
अजितदादांची जहरी टीका : पण आता त्यांच्या नाकावर टिच्चून सुप्रियाताई स्वीकारणार संसद महारत्न पुरस्कार
निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) गुहागर (Guhagar) मतदारसंघात तळी (Tali) येथे शुक्रवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राणे यांचा ताफा चिपळून येथील जाधव यांच्या कार्यालयासमोर आला असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात मोठ्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
“गप्प बसण्यावसाठी म्हाडाचं अध्यक्षपद दिलेलं नाही” : आढळरावांचा ‘शिरुरवर’ दावा कायम!
वादाची नेमकी किनार कुठे?
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत कणकवली सभा झाली होती. या सभेत भास्कर जाधवांनी राणे पिता पुत्रांवर जहरी टीका केली होती. भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियांनी यापूर्वी पार पडलेल्या भर सभांमधून एकमेकांवर पातळी सोडत टीका केली आहे. दोन्ही नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकांना दोन्ही स्वतः राणे आणि त्यांच्या पुत्रांनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
कणकवलीतील सभेत झालेली टीका राणे कुटुंबियांना चांगली जिव्हारी लागली. या सभेत जाधव यांनी राणेंवर बोचरी टीका केली होती. यात त्यांनी नारायण राणेंना (Narayan Rane) नेपाळी वॉचमन असे संबोधत नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो असा उल्लेख केला होता. एवढेच नव्हे तर, नारायण राणेंचे नाव न घेता त्यांना कोंबडी चोर म्हणूनही संबोधले होते.
नाऱ्याचे दोन चंगू मंगू, तो एक नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, सकाळ संध्याकाळी टीव्ही चालू केला की हे घाणेरडं तोंडाचं समोर येतं असेही जाधव म्हणाले होते. आता एवढी टीका करून जाधव शांत बसतील तर.. पण त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकतं नारायण राणेंच्या विग वरही टीका केली. यात त्यांनी नाव न घेता नेत्याच्या डोक्यावर पीक आलंय असं म्हटलं तर, निलेश राणे म्हणजे चरशी आहे अशी टीका केल होती.
हिशोब चुकता करणार ते गुन्ह्याला माफी नाही
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची वेळोवेळी केलेली टीका राणे पिता पुत्रांच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी निलेश राणेंनी गुहागरमध्ये सभेचे आयोजन केले. या सभेसाठी जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. जाधवांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना उचकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभांचे टिझर व्हायरल करण्यात आले होते. यात हिशोब चुकते करणार, गुन्ह्याला माफी नाही असे आव्हान देणारी बॅनरबाजी करण्यात आल्याचे जाधवांनी म्हटले आहे.
Nilesh Rane : ताफ्यावरील दगडफेकीनंतर राणेंची जीभ घसरली; जाधवांवर खालच्या भाषेत जोरदार हल्लाबोल
…म्हणून शांत बसलो
दगडफेकीच्या घटनेनंतर चिपळूनमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणेंच्या आव्हानात्मक बॅनरबाजी आणि टीझरनंतरही शांत बसलो. कारण चिपळूणची संस्कृती आहे, कोणाच्या झेंड्याला, बॅनरला हात लावायचा नसल्याचे जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
निलेश राणे जाणीवपूर्वक चिपळूनमध्ये आले.
उचकवण्यासाठी चिपळूनमध्ये आले
निलेश राणेंची सभा गुहागरला होती. निलेश राणे मुंबईतून आले. वास्तविक पाहता त्यांनी डायरेक्ट गुहागरला जाऊन सभा घेणं आवश्यक होतं, पण ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. राणेंना दापोली मार्गे बेरीबोटीने डायरेक्ट गुहागरला जाऊन सभा घेणं अपेक्षित होतं. परंतु, ते जाणीवपूर्वक चिपळूनला आले. एवढेच नव्हे तर, त्यांनी मुद्दाम माझे कार्यालय आणि घरासमोर मोठा सत्कार करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा दगडफेक राणेंच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. पण घडलेल्या एकूण घटनेची किनार बघता कोंबडी चोर, नेपाळी वॉचमनचं पोरगं ते निलेश राणे चरसी आहेत ही शाब्दीक टीका थेट गाड्यांवर दगडफेकीपर्यंत येऊन पोहचली असल्याचे आधोरेखित होत आहे.