व्हिडिओ, पिक्चर, पनौती अन् मतदारसंघ; निलेश राणेंनी राऊतांचं सगळंच बाहेर काढलं

व्हिडिओ, पिक्चर, पनौती अन् मतदारसंघ; निलेश राणेंनी राऊतांचं सगळंच बाहेर काढलं

Nilesh Rane On Sanjay Raut : मागील काही दिवसांपासून राज्यात व्हायरल फोटो, व्हिडिओच्या प्रकरणांवरुन चांगलचं वातावरण तापलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा कथिक फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही(Sanjay Raut) ही संधी सोडली नाही. राऊतांनी बावनकुळेंचा फोटो व्हायरल करीत निशाणा साधला होता. त्यावर आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊत एकेरी उल्लेख करत यांचा व्हिडिओ, पिक्चर, पनौती आणि मतदारसंघातील गोष्टी सगळचं बाहेर काढलं आहे.

राऊत साहेब, औकात काढू नका सरंपचाच्या निवडणुकीतही तुम्हाला..; CM शिंदेंवरील टीका दरेकरांना झोंबली

निलेश राणे म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा आता पिक्चर संपला आहे. संजय राऊत महाराष्ट्राला आता काहीही दाखवत आहेत. सध्या ते रिकामटेकडे आहेत, म्हणूनच फोटो, व्हिडिओ शोधत असतात. त्यांचाच कधी व्हिडिओ निघेल हे कोणी सांगू शकत नाही. स्वत:चं किती झाकून ठेवलंय हे येणाऱ्या काळात आम्हीही दाखवू शकतो, असा इशारा निलेश राणेंनी दिला आहे.

आरोग्यासाठी एडीबीकडून 500 दशलक्ष US डॉलर्सचे सहाय्य, फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

तसेच राजकारणात लोकांनी मर्यादा ठेवायला हवी. संजय राऊत मर्यादा न ठेवणारी व्यक्ती आहे. येणाऱ्या काळात त्यांचेही व्हिडिओ निघतील त्यानंतर मग दुसऱ्यांवर बोटं ठेऊन दुसऱ्यांवर आरोप करुन फायदा नसेल ते आता व्हिडिओ पार्लर चालवण्याचं काम करीत असल्याचा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.

विवाहबाह्य संबंध आता गुन्हा ठरणार? हिवाळी अधिवेशनात क्रांतीकारी निर्णय होण्याची शक्यता


राऊत टिव्हीवर दिसतात तेव्हापासून पनौतीच…

संजय राऊत जेव्हापासून टिव्हीवर दिसायला लागले आहेत. तेव्हापासून पनौती लागली आहे. पण मी असं म्हणणार नाही, खरंच जरी पनौती लागलेली असेल तरीही ही राऊतांची पनौती असं आम्ही म्हणत नाही.


स्वत: सुधरला नाही अन् पंतप्रधानांवर बोलतो…

संजय राऊत यांच्याकडून आता एक खासदार म्हणून ते राज्याचा विकास करतील अशी भावना संपलेली आहे. त्यांना आणखी व्हिडिओ व्हायरल करायचे असतील तर त्यांना पाठवतो. मुंबईतील राऊतांच्या मतदारसंघात राज्यातील सर्वाधिका झोपडपट्ट्या आहेत. त्यांनी आत्तापर्यंत आपला मतदारसंघही सुधारलेला नाही. जे स्वत:च सुधरु शकत नाहीत, ते कुठं देशाच्या पंतप्रधानांवर बोलत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊत माध्यमांद्वारे सत्ताधाऱ्यांवर अनेकदा टीका-टीप्पणी करीत असल्याचं दिसून येत आहेत. त्यांच्या या टिकांवरुन निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आता निलेश राणेंच्या टीकेवर संजय राऊत काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube