राणेंवर प्रश्न विचारताच भास्कर जाधव भडकले, ‘राणेंना मी घाबरत नाही, पण…’

राणेंवर प्रश्न विचारताच भास्कर जाधव भडकले, ‘राणेंना मी घाबरत नाही, पण…’

Bhaskar Jadhav : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांना आज ईडीने अटक केली आहे. मुंबई महापालिकेच्या कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. पाटकर यांना अटक होताच भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला होता. आता संजय राऊत फार काळ बाहेर राहणार नाहीत. त्यांनीही आता तयारी करावी, असा इशारा त्यांनी दिला. यावर आता ठाकरे गटाचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नितेश राणेंचा चांगलाच समाचार घेतला. (Bhaskar Jadhav on nitesh rane over sanjay raut)

https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg

आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी भास्कर जाधव यांना नितेश राणेंनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेविषयी विचारले असता, जाधवांनी माध्यमांनाच प्रतिप्रश्न केला. ते म्हणाले, तुम्ही मला वारंवार राज्यातील काही वाह्यात गेलेली माणसं आहेत, त्यांच्याबद्दल विचारू नका, हे मी अनेकदा सांगितलं. तुम्ही ज्यांची नावे घेता, त्यांच्याबद्दल जनतेची मत काय आहेत, ते बघा. सोशल मीडियावर त्यांनी काही लिहिलं तर त्याखाली काय कमेंट येतात, हे वाचा आणि त्यांना किती महत्व द्यायचं हे ठरवा. त्यांच्या वक्तव्याला मी काडीचीही किंमत देत नाही. किंबहुना समाजातही त्यांना महत्व नाही. मी काही त्यांना घाबरत नाही. पण, त्यांच्या पंक्तीत मला बसायचं नाही. त्यामुळं मी बोलणार नाही, असं जाधव म्हणाले.

शरद पवार अजितदादांसोबत येणार, अजूनही विश्वास; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा 

आज विधानसभेत बोलतांना भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांवर आपल्याला ठरवून बोलण्याची संधी दिली जात नाही, असा आरोप केला. यावरही जाधवांनी भाष्य केलं. माझ्या राजकीय जीवनात मी कधीच कोणावर व्यक्तीगत राग ठेवत नाही. मी आजवर अनेकांशी पंगा घेतला. अनेकांशी दान हात केले. पण मी कधीच वैयक्तीक चारित्र्यहनन करत नाही. माझा जो राग किंवा आक्षेप असतो, तो धोरणात्मक असतो. विधानसभेचे अध्यक्ष हेही एका पक्षाचे सदस्य असतात. पण, त्यांचं लक्ष डाव्या बाजूला असलं पाहिजे. हा माझा वैधानिक आक्षेप आहे. त्यांच्यावर वैयक्तिक राग नसल्याचं जाधवांनी सांगितलं.

राणे काय म्हणाले?
सुजित पाटकर हा संजय राऊत यांचा पार्टनर आहे. संजय राऊत हा चोर आहे. सुजितचे सर्व पैसे राऊतकडे होते. संजय राऊत फार काळ बाहेर राहणार नाही. त्याने आता तयारी करावी? संजय राऊत हिजाब घालून फरार होऊ शकतो, त्यामुळे लुकआउट नोटीस काढण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube