Download App

शिवरायांचा पुतळा कोसळला! आमच्यासाठी दुर्देवच, मुख्यमंत्री शिंदेंनी मौन सोडलं

जोरदार वाऱ्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, ते दुर्देवी आहे. आमचे मंत्री परिस्थितीची पाहणी करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीयं.

Cm Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आमच्या भावना जोडलेल्या आहेत, आपण त्यांची देवासारखी पूजा करतो. जोरदार वाऱ्यामुळे पुतळा कोसळला, ते दुर्देवी आहे. आमचे मंत्री परिस्थितीची पाहणी करीत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलंय. तसेच हा पुतळा पुन्हा उभारण्यात येईल असे ते म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं समोर आलंय. मागील वर्षी नौदल दिनानिमित्त सिंधुदूर्गमधल्या मालवणमध्ये शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. मोदींच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 ला या पुतळ्याचं अनावरण झालं होतं.

शिवरायांचा पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शिवरायांचा पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळला आहे. सहा महिन्यांपूर्वीच पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याचं काम सुरु असताना स्थानिक लोकांकडून पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या पण या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलायं.

साखर विक्रीच्या नावाखाली 58 लाखांना फसवलं; शिवसेना उपनेते साजन पाचुपतेंसह संचालक मंडळावर गुन्हा!

अनावरणानंतर पुतळ्याचं काम प्रगतीपथावर होतं, मात्र, अचानक पुतळा कोसळल्याची घटना घडलीयं. या घटनेवरुन विरोधकांनी काही संधी सोडली नाही. एकीकडे कॉंग्रेस तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेश शरद पवार गटाने भाजपला चांगलच फैलावर घेतलंय. पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला, राजांचा पुतळा नाही, महाराष्ट्र धर्म पडला, असल्याचा संताप शरद पवार गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात शरद पवार गटाने एक्सवर पोस्ट शेअर केलीयं.

शरद पवार गटाने पोस्टमध्ये म्हटलं, “तप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला.. राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला..!! आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका…!! नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला..!!” असल्याचं पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

follow us