Download App

“मनाला पटत नाही तिथे वेळ घालवण्यात अर्थ नाही” : नारायण राणेंच्या पुत्राची राजकारणातून निवृत्ती

रत्नागिरी : “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही” असं म्हणत माजी खासदार आणि भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. विजयादशमीदिनी त्यांनी ट्विट करुन याबाबतची घोषणा केली. त्यांनी केलेल्या या अचानक घोषणेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. (Former MP and BJP leader Nilesh Rane has announced his retirement from active politics)

काय म्हणाले निलेश राणे?

नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19/20 वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

Sanjay Raut : ‘फडणवीसांना जास्त कंठ फुटलाय, आधी ‘ड्रग्ज’च्या रावणाला संपवा’; राऊतांचा घणाघात

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र! अशी घोषणा त्यांनी केली.

कोण आहेत निलेश राणे :

निलेश राणे हे 2009 मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्येही ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. पुढे काँग्रेसपासून वेगळे होत त्यांनी वडील नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला. या पक्षाच्या माध्यमातूनही त्यांनी 2019 ची लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यातही त्यांचा पराभव झाला.

आगामी निवडणुकीत भावना भडकवल्या जाणार, सरसंघचालकांचं जनतेला आवाहन

यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपचे सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली. शिवाय कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख म्हणूनही ते काम करत होते. पुढील 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरु होत्या. मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.

Tags

follow us