Download App

इर्शाळवाडीच्या बचावलेल्या नागरिकांचा वनविभागावर मोठा आरोप; गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • Written By: Last Updated:

landslide collapse in Raigad Irshalwadi : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात आहेत. तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेता येत नाही. तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. (landslide collapse in Raigad-khalapur-Irshalwadi, We were alerted by the administration, but the citizens told us about the disaster)

परंतु अशा घटना होतातच कशा असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला. अशा घटना होणार आहे हे जर प्रशासनाला कळत नसेल तर हे प्रशासन काय कामाचं असे राज ठाकरे म्हणाले. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना जेथे घडली तेथील एका नागरिकाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की आम्हाला प्रशासनाने सतर्क केले होते. की अशी दरड कोसळण्याची घटना पावसाळ्यात तुमच्या परिसरात होऊ शकते. म्हणून तुम्ही पावसाळ्यात सुरक्षित जागी राहायला जावे.

यानंतर तेथील नागरिक आपले राहते घर सोडून जवळच असलेल्या एका जंगलामध्ये झोपड्या करून राहू लागले. परंतु वनविभागाने त्यांना तेथे राहण्यास मज्जाव केला. आणि त्यांच्या झोपड्या मोडल्या आणि त्यांना जंगलातून हाकलून लावले. असे वनविभागाने एकदा नाही तर अनेक वेळा केले. असे तेथील नागरिकांनी सांगितले. म्हणून या घटनेला प्रशासन नवे तर वनविभाग जबाबदार आहे असा आरोप तेथील नागरिक करत आहेत. तसेच हे नागरिक वनविभागावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

थोरात-मुनगंटीवारांची जुंपली! तुम्हाला खाली बसावचं लागेल, थोरातांचा मुनगंटीवारांना दम…

दरडी कोसळण्याच्या घटनांची किमान 24 ते 48 तास आधी पूर्वकल्पना देऊ शकणारी ‘सतर्क’ यंत्रणा पुण्यातील ‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’ने विकसित केली आहे. मागील जवळपास 9 ते 10 वर्षांपासून दरडी कोसळण्याचा इशारा देण्याचं काम ही संस्था करत आहे. मागच्या पडलेल्या पावसाची अद्यावत माहिती, पुढच्या किमान 6 दिवसांचा पावसाचा अंदाज आणि दरडप्रवण भागांमधील नागरिकांकडून मिळणारी माहिती या आधारे ‘सतर्क’ राज्यातील नागरिक, शासन आणि प्रशासनाला दरडीबाबत सतर्क करण्याचं काम करते. फेसबुक, ट्विटरवरून देखील याबाबत अपडेट्स देत असते.

Tags

follow us