Maharashtra Rain Update : सध्या सर्वदूर परतीचा पाऊस सुरु आहे. काही दिवसांपासून परतीच्या पावसाने ब्रेक न घेताच जोरदार बरसल्याचं दिसून आलं आहे. अशातच आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यााल पावसाने चांगलचं झोपडलं आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पुराने वेढा घातला असून पुढील दोन दिवसही धो-धो पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसही पावसाला सुट्टी नसल्याचंच दिसून येत आहे.
टेनिस-स्क्वॉशमध्ये गोल्ड, हॉकीमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; आशियाई क्रीडा स्पर्धेत सातवा दिवस भारताचा
राज्यातील दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवस धो-धो पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळेच पुढील 2 दिवसांत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाकडून जरी इशारा देण्यात आला असला तरीही रत्नागिरीमध्ये आज सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
“बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने…” : ठाकरेंच्या टीकेवर शेलारांचा पलटवार
राज्यात तीन दिवसांपूर्वीच गणरायाला निरोप देण्यात आला. गणेशोत्सवातही पावसाने जोरदार हजेरील लावल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता पुढील दोन दिवसही पाऊस विश्रांती घेत नसल्याने काढणीला आलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांत येणार पाऊस कसा असेल? याबाबत शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
एकत्रित प्रवास, शेजारी जागा, जाहीर कौतुक : अजितदादांचा मंत्री सावलीसारखा पवार-सुळेंसोबत
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा अति वेगाने येत असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. कोकणातील जिल्ह्यात बारा तासापेक्षा अधिक जोरदार पाऊस कोसळत आहे.
Maratha Reservation : मनोज जरांगे पुन्हा मैदानात! आजपासून 13 जिल्ह्यांत फिरणार
पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, समुद्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात नैसर्गिक बदल आढळून येत असल्याने समुद्राला जोरदार करंट आहे. त्यामुळे समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तसेच कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
मराठी माणूस मुंबईच्या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे; समीर भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका…
रत्नागिरीत 1950 ची पुनरावृत्ती :
जिल्ह्यात 1950 साली अशाच पद्धतीने पावसाने दाणादाण उडवली होती. त्यावेळी झालेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील घरे अक्षरश: वाहून गेली होती. आत्ताही त्याच पद्धतीने पाऊस बरसत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे 1950 सालचीच पुनरावृत्ती होते कायं? अशी शक्यता वर्तवण्यात येत असून अनेक गावांना पुराने वेढा दिला आहे.