Download App

निलेश राणेंनीच गाड्या फोडा म्हणून सांगितलं; भास्कर जाधवांचा आरोप

  • Written By: Last Updated:

Jadhav vs Rane : सध्या चिपळूणमधील (Chiplun) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल (दि. १६ फेब्रुवारी) ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाध (Bhaskar Jadhav) आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत निलेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केला.

जुना फोटो शेअर करत रोहित पवारांचे अजितदादांना आता थेट आव्हान 

काल झालेल्या दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटाच्या तिघांना अटक केली. याशिवाय, ३०० ते ४०० जणांविरोधात गुन्हा दाखल केले. याबाबत बोलतांना जाधव म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यांची कसली धरपकड करता, फुटेज तपास, क्लीप पहा, तेच समोरून चाल करून आले. माझा एकही माणूस बॅरीगेटच्या बाहेर गेला नाही. फडेजमध्येच दिसंतय की, निलेश राणेच गाड्या फोडा म्हणून सांगत आहेत. गाड्यांधये बॉक्समधून भरून आणलेले दगड व्हिडिओमधून दिसत आहेत. ते फुटेज तपासा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

CM शिदेंच्या भाषणाकडे कोल्हापूरकरांनी फिरवली पाठ, रिकाम्या खुर्च्या पाहून मुख्यमंत्र्यांचा हिरमोड 

जाधव म्हणाले, माझ्या कार्यकर्त्यांना अटक होत आहे, पण मी माझ्या कार्यकर्त्यांना असं वाऱ्यावर सोडणार नाही. मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. उद्या मला अटक झाली तरी चालेल, असा इशाराही त्यांनी जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जाधव पुढं म्हणाले की, निलेश राणे हे मुंबईतून येणार होते. मग त्यांना गुहागरला जाण्यासाठी दोन मार्ग होते. एक दापोली खेडमधून आणि दुसरा पेढे परशुराम येथून. मात्र तसे न करता ते साठ किलोमीटर चिपळूणात आले. मुद्दाहून त्यांनी हे केलं. त्यांच्या गाड्या माझ्या ऑफिससमोरून गेल्या. मात्र आम्ही कोणालाही रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या सर्व प्रकाराची पूर्वकल्पना आम्ही पोलिसांना दिली होती. त्यांचा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता. माझ्या कार्यालयावर दगडफेक करणार, राडा करणार, हे मी होऊ देणार नव्हतो. हेच मी पोलिसांना सांगितलं, असं जाधव म्हणाले.

ते म्हणाले, सुरुवातीला पोलिसांनी त्यांना रोखले. पण नंतर कुठूनतरी त्यांच्यावर दबाव आला. त्यांनी आमच्याच कार्यकर्त्यांना रोखलं आणि मोकळं सोडलं. समोरून चाल करण्यात आली. पोलिसांनी चराशे लोकांवरती काय, हजार लोकांवर गुन्हे दाखल करावे, पण त्यापूर्वी फुटेज तपासावे, असं आव्हान जाधव यांनी केलं.

follow us