उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्वाकांक्षीमुळे 30 वर्षांची भाजप-सेनेची युती तुटली असल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. त्यावर संजय राऊतांच्या टीकेला आमदार राणे यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रातही सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी भाजप सेनेची युती होती. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मोदींच्या आशिर्वादानेच आमदारकी, खासदारकी मिळाली आहे. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचं बिस्कीट दिल्यानंतर उद्धव ठाकरे हे लाळ टपवकवत महाविकास आघाडीत गेले, अशी टीका त्यांनी केलीय.
पंतप्रधानांनी स्वतःच्या मुलालाही सोडलं नाही; जपानमध्ये घडलं मोठं राजकीय नाट्य
राज्यात असलेली 30 वर्षांची भाजप-सेनेची ही युती उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे तुटली असून त्यांनी बाळासाहेबांचे विचार गाडून टाकण्याचं काम केलं आहे. आता ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन होण्याची तयारी सुरु झाली असल्याचं भाकीतही त्यांनी यावेळी केलं आहे.
Sidhu Moosewala : मेरा नाम…; मृत्युनंतरही चार्ट बस्टरवर सिद्धूचाच जलवा
आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याची परिस्थिती असून ठाकरे गटातील नेते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुका लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र
मोदींचे नऊ वर्ष म्हणजे नाकेनऊ आणणारे असल्याचा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला होता.
त्यावरुन आता नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या खोचक टीकेवर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.