Sidhu Moosewala : मेरा नाम…; मृत्युनंतरही चार्ट बस्टरवर सिद्धूचाच जलवा
Sidhu Moose Wala: दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Siddhu Mosse Wala) यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या गाण्यांनी चाहत्यांच्या मनात महत्वाचे स्थान मिळवले आहे. गेल्यावर्षी सिद्धू मूसेवाला यांची 29 मे रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज सिद्धू मूसेवाला यांची पहिली पुण्यतिथी आहे.
View this post on Instagram
सिद्धू मूसेवाला यांचा मृत्यू होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्यांची गाणी (Sidhu Moose Wala Songs) चाहत्यांना आज देखील भुरळ पाडत असतात. सिद्धू मूसेवाला यांची गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. सिद्धू मूसेवाला यांच्या निधनाने त्याच्या चाहत्या वर्गाला मोठा धक्का बसला होता. त्यांची गाणी आज देखील चाहते आवडीने ऐकत असतात. त्यांच्या गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
अनेक गाण्यांच्या अॅपवर सिद्धू मूसेवाला यांची गाणी आज देखील ट्रेंड होत आहेत. Spotify या अॅपवर ‘नेव्हर फोल्ड’, JioSaavn वरील ‘मेरा ना’ आणि Wynk वरील ‘डॉक्टर’, Apple म्युझिकवर ‘लेव्हल्स’ आणि ‘नेव्हर फोल्ड’, गाना अॅपवर ‘295’, ‘द लास्ट राइड’, GOAT आणि ‘लिजेंड’ ही गाणी चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडतात. मिळालेल्या माहितीनुसार, Spotify च्या एका प्रवक्त्याने सांगितले आहे की, सिद्धू मूसेवाला यांचे चाहते त्यांना आमच्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या गाण्यांद्वारे जिवंत ठेवत आहेत.
अनेकवेळा त्यांची गाणी Spotify चार्टवर असतात. आमच्या चार्टवर वेगवेगळी गाणी असतात. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. सिद्दू मूसेवाला यांच्या निधनानंतर त्यांच्या गाण्यांनी 2 कोटींपेक्षा जास्त प्रमाणात कमाई केली आहे. गेल्या काही दिवसापासून सिद्दू मूसेवाला यांचे ‘मेरे ना’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणेही चाहत्यांना खूप मोहा प्रमाणात आवडले आहे.
राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले
विशेष म्हणजे या नवीन गाण्यात ग्रॅमी पुरस्कार विजेते नायजेरियन रॅपर बर्ना बॉयने याला आवाज दिला आहे. मूसेवाला यांच्या निधनानंतर रिलीज झालेले हे त्यांचे तिसरे गाणे होते. याअगोदर त्यांची वॉर आणि एसवायएल ही दोन गाणी मोठ्या प्रमाणात रिलीज झाली होती. सिद्धू मूसेवाला यांनी मृत्यूअगोदर अनेक गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या वडिलांनी ती सर्व गाणी रिलीज होणार असल्याचे सांगितले होते.