रत्नागिरी : गेले अडीच वर्षे दापोलीतील (Ratnagiri) शिवसैनिक भरडला जात होता. राष्ट्रवादी वाढली तरी चालेल पण रामदास कदम (Ramdas Kadam) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) संपला पाहिजे या वृत्तीला एकनाथ शिंदेंनी आळा घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर शिवसैनिकांना न्याय मिळाला नसता. दापोलीतील शिवसैनिकांना संपवण्याचे काम दुर्दैवाने तत्कालीन शिवसेना पक्ष प्रमुखांनी केलं, असा आरोप शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला आहे.
2019 ला निवडून येण्याच्या अगोदरपासून मला संपवण्याचा प्रयत्न केला. रामदास कदम यांना संपवण्याचे कारस्थान मातोश्रीत रचले जात होते, असा आरोप योगश कदम यांनी केला आहे. दापोली नगरपालिका निवडणुकीत शिवसैनिकांवर अन्याय झाला तरी शिवसैनिक लढला. दहा अपक्ष शिवसैनिक निवडून आले. वारंवार आमच्यावर अन्याय केला. जगात कोणताच पक्ष नसेल जो आपल्याच आमदारांना संपवायला निघाला होता, अशी टिका योगेश कदम यांनी केली आहे.
Chandrkant Patil : शिवसेनेच्या वाट्याला किती जागा? आत्तापासून ठरविण्याचं कारण नाही
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांना विनंती केली होती पण सहा महिने उद्धव ठाकरे भेटले नाहीत. रामदास कदम यांनी बाळासाहेबांचा उजवा हात म्हणून काम केले. शिवसेना रुजवली त्याच रामदास कदम यांच्या मुलांला वगणूक देते होते. एकनाथ शिंदेंनी एक दिवस निर्णय घेतला. आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि आम्हाला न्याय भेटला, असे योगेश कदम म्हणाले.