Chandrkant Patil : शिवसेनेच्या वाट्याला किती जागा? आत्तापासून ठरविण्याचं कारण नाही

Chandrkant Patil : शिवसेनेच्या वाट्याला किती जागा? आत्तापासून ठरविण्याचं कारण नाही

पुणे : भाजप गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला किती जागा जातील, हे आत्तापासून ठरविण्याचे कारण नाही. शिवसेनेला आमची तयारी उपयोगी पडेल, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पाटील हे आज पिंपरी-चिंचवड शहर दौर्‍यावर आले होते.

दरम्यान, त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पिंपरी-मासुळकर कॉलनी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर आणि नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, सरकारी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी 3 निवृत्त आयएएस अधिकार्‍यांची समिती नेमली आहे.

एक गाय विकायचो अन् एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला किस्सा

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे देखील संपात सहभागी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. मात्र, त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांचे हाल होत आहेत. संबंधित कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावुन काम करणे अपेक्षित होते. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षांचा काळ असल्याने तसेच, रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने संपकरी कर्मचार्‍यांनी कामावर परत यावे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 10 ते 12 आमदार फुटणार; मंत्री सामंतांचा खळबळजनक दावा

जुन्या पेन्शन योजनेमुळे सरकारवर येणारा अतिरिक्त ताण व अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे. तसेच बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. दरम्यान, भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढविणार तर, शिवसेनेला अर्थात शिंदे गटाला 48 जागा दिल्या जातील, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे.

बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेनेच्या काही आमदारांनी घेतला असून बावनकुळेंना असा अधिकार कुणी दिले, आमची चर्चा पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाल्याचं म्हटलं आहे. यानंतर बावनकुळे यांनीही आपल्या वक्तव्यावर सावरासावर करत निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हे वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून मात्र शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube