ते मुख्यमंत्री होते, मी विरोधी पक्षनेता; शरद पवारांनी अंतुलेंबरोबरच्या संघर्षाची आठवण सांगितली

Sharad Pawar on Antule रायगड : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Raigad District Central Co-Operative Bank) स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा आज झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार अनंत गीते उपस्थित होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोदींनी केलेल्या टीकेला […]

ते मुख्यमंत्री, मी विरोधीपक्ष नेता, पवारांनी अंतुलेंबरोबरच्या संघर्षाची आठवण सांगितली.

Sharad Pawar

Sharad Pawar on Antule रायगड : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Raigad District Central Co-Operative Bank) स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा आज झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार अनंत गीते उपस्थित होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोदींनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. तर शरद पवार यांनी आपल्या भाषणात दिवंगत, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल अंतुले यांच्या आठवणी सांगितल्या.


थोरल्या पवारांवर टीका, पण धाकट्या पवारांच्या घोटाळ्याचा उल्लेखही नाही; ठाकरेंची मोदींवर टीका

शरद पवार म्हणाले, बॅरिस्टर अंतुले यांनी रायगड जिल्ह्याचे व राज्याचे नेतृत्व केले. एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणून ते राज्याला परिचित होते. मला आठवतेय एकदा मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. मी पालकमंत्री असताना एकदा अंतुले यांच्याबरोबर संबंध जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हिंडले होतो. त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली. शेवटचा माणूस ओळखणारे नावाने व कामाचे वेगळे व्यक्तिमत्व अंतुले हे होते. त्यांनी व्यापक संपर्क लोकांबरोबर ठेवला होता.


…तर आम्हाला मराठा मुख्यमंत्री नको, सीएम शिंदेंविरोधात त्यांचाच पदाधिकारी आक्रमक

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम केले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही संघर्षही केला. ते मुख्यमंत्री होते. मी विरोधीपक्षाचा नेता होतो. अनेक वेळा संघर्षाची भूमिका आम्ही घेतली. तर नरसिंहराव राव यांच्या सरकारमध्ये ते आणि मी एकत्र मंत्री म्हणून काम करत होतो. त्यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी होती. त्यावेळी ते देशाचा, राज्याचा विचार करत होते.


जयंत पाटलांमध्ये सरळ करण्याची ताकद : शरद पवार

प्रत्येक जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बँकांचे महत्त्वाचे योगदान आहे. तेच काम रायगड जिल्हा बँकही करत आहे. भाई जयंत पाटील हे रायगड बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा स्वभाव पाहता कोणी बँकेची थक्कीत रक्कम ठेवणार नाही. थकीत रक्कम ठेवणाऱ्यांना सरळ करायची ताकद त्यांच्याकडे आहे. जिल्हा बँकेची वसुली चांगली आहे. चांगल्या नेतृत्वामुळे ते शक्य असल्याचे असे कौतुकही पवारांनी जयंत पाटील यांचे केले आहे.

Exit mobile version