Download App

ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत, नाहीतर खुर्ची… योगेश कदम आणि नितेश राणे या दोन मंत्र्यांत जुंपली !

Nitesh Rane: गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. एफआयआरमध्ये कुणाचे नाव आले नसेल, कोण असेल वाचविणारे कुठे बसलेले आहेत.

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane VS Yogesh Kadam: दापोलीमध्ये दोन दिवसांपूर्वी दगडफेकीची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु आता महायुतीमधील (Mahayuti) दोन मंत्र्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. भाजपचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (
Nitesh Rane) यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघात जावून हिंदू धर्मसभा घेतली. त्यांना वाचविणारे हे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठे नाही, असा टोला राणे यांनी कदमांना लगावला आहे. त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदमही (Yogesh Kadam) चिडले. माझ्या मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला बाहेरून आलेल्यांनी शिकवण्याची आवश्यकता नाही, असे प्रत्युत्तर कदम यांनी दिले.

Pahalgam Attack: IGNOUतून शिक्षण, मग पाकिस्तान गाठलं, मास्टरमाइंड आदिल हुसैन आहे तरी कोण?

नितेश राणे यांनी शुक्रवारी हिंदू जनजागृती सभा घेतली. त्यावेळी ते म्हणाले, या पुढे कुठलाही दगड तुमच्यावर आला तर प्रत्येक दगडाचा हिशोब चुकता होईल. काही चिंता करू नका हे कुठे जात नाहीत. गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. एफआयआरमध्ये कुणाचे नाव आले नसेल, कोण असेल वाचविणारे कुठे बसलेले आहे. ते काय देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत, संबंधित खात्यातील लोकांपेक्षा. उद्या फडणवीस यांच्याकडे हा विषय जाईल. तेव्हा उत्तरे द्यावी लागतील ना. तुम्हाला जेव्हा कोणी वाचवायला किंवा फोन करायला आली असतील ना तेव्हा सर्व फोन बंद करून बसतील हे लक्षात ठेवा. तेव्हा आजूबाजूचे फोन देणार नाहीत. नको रे बाबा असलेली खुर्ची पळून जाईल. हा समुद्र किनारा सुरक्षेत ठेवण्यासाठी मी मंत्रालयात बसलो आहे.

…तर युद्धासाठी तयार राहा, घौरी, शाहीन हे काय फक्त प्रदर्शनासाठी नाहीत; पाकिस्तानी मंत्र्यांची धमकी

त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कदम म्हणाले, ते माझे मित्र आहेत. पण माझ्या मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला बाहेरून आलेल्यांनी शिकवण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, मी गृहविभागाच्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करतो. शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. आमच्या हातातील भगवा झेंडा आम्ही कधीही खाली ठेवलेला नाही, आणि तो भविष्यातही अभिमानाने फडकवत राहणार आहोत.
योगेश कदम यांनी टीका करणाऱ्यांवर निशाणा साधत म्हटले की, ज्यांचे स्वतःच्या भागात नियंत्रण नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या मतदारसंघात डोकावण्याआधी आरशात पाहावे. आम्ही गोंधळ निर्माण करण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी काम करतो. स्थानिक लोकांनी चुकीची माहिती दिली असते. एखादा मला फोन केला असला तरी सांगितले होते. मतदारसंघात आमदार आहे. माझ्याशी बोलायला का वाटले नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माझा मतदारसंघ शांत कसा ठेवायचा हे मला चांगल माहित आहे. त्यांनी कुठे सभा घ्यावी? काय घ्यावी? हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील तर मला आनंद आहे. पण माझ्यावर जर ते टीका करत असतील तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असा टोला मंत्री योगेश कदम यांनी दुसरे मंत्री नितेश राणे यांना लगावला आहे. नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, अशी टीकाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नितेश राणे यांनी दापोलीतील सभेत केलेल्या उत्तर देताना केली.

follow us