Download App

Nitin Desai Suicide Case : इसीएल कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह चौघांची कसून चौकशी

  • Written By: Last Updated:

Nitin Desai Suicide Case : कलादिग्दर्शक, एन. डी. स्टुडिओचे नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. मंगळवारी इसीएल (ECL) फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तीन अधिकारी यांच्याकडे पोलिस चौकशी करत आहे. या चौघांचीही दिवसभर कसून चौकशी करण्यात आली आहे. या सर्वांना पुन्हा 11 ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळी दहा वाजता चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. (Nitin Desai Suicide Case ECL company director and three people inquiry)

याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले, दिवसभर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. पण त्यांनी चौकशीत उपलब्ध करून दिलेली माहिती त्रोटक आणि अपूर्ण आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले असल्याचे झेंडे यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानचे पंतप्रधान देणार राजीनामा; असेंब्ली विसर्जित करण्याची शिफारस

नितीन देसाई यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या ए. डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. देसाई यांच्यावर खासगी वित्त संस्थेचे तब्बल अडीचशे कोटीहून अधिक कर्ज होते. या कर्जाची वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यामुळे देसाई यांनी आत्महत्या केल्याचे कारण समोर आले होते.

‘मला घरातून फरफटत नेलं अन् 14 दिवस..,’ नवनीत राणांच्या विधानाने लक्ष वेधलं

याप्रकरणी नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्या फिर्यादीवरून खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. ईसिएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या संचालकांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार ईसिएल फायनान्सचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फणींद्रनाथ काकरला व इतर तीन पदाधिकारी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यांची दिवसभर चौकशी करून त्यांना सोडण्यात आले आहे. पुन्हा 11 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. या गुन्ह्याचा तपास खालापूरचे उपअधीक्षक विक्रम कदम हे करीत आहेत.

Tags

follow us