Raj Thackeray On Barsu Refinery: राज्यभर बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery)राजकारण तापलं आहे. मात्र आजर्यंत राज ठाकरेंनी यावर आपली प्रतिक्रीया दिली नव्हती. आज मात्र मनसेच्या (MNS)रत्नागिरीमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बारसू प्रकल्पाला विरोध करत कोकणवासियांवर (Konkan)जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बारसू प्रकल्पाला जमिनी देणाऱ्यांवरही घणाघाती टीका केली आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आपल्या पायाखालून जमीन निघून जात आहे तरी कोकणातील माणसाला कळत कसं नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, शेकडो एकरांचे व्यवहार होत आहेत ते. लोकप्रतिनिधींना हे सर्व माहीत असतं, कुठे प्रकल्प येणार ते, मग तेच जमिनीचे व्यवहार करून हजारपट नफा कमवतात.
लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्याकडून कवडीमोलाने जमीन घेतात आणि सरकारकडून भरमसाट पैसे घेतात. आणि ह्यावर कोणीही बोलत नाही. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व काय? कोण तुम्ही? तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणजे काय आहात? या जमिनीचा तुकडा तुमच्या नावावर आहे, त्यावर तुम्ही उभे आहेत.
जमीन म्हणजे काय? भूगोल. मोगलांचं राज्य आलं, ब्रिटीशांचं राज्य आलं, युद्ध झाले. यांनी तिथे आक्रमण केलं, या सगळ्यांचा इतिहास म्हणून पाहिलं तर तो इतिहास भूगोलाशिवाय नाही. प्रत्येकाने जमीन पादाक्रांत केली, जमीन ताब्यात घेतली. या देशाची, प्रदेशाची जमीन ताब्यात घेतोय. हे जमीन ताब्यात घेतो ना त्याला इतिहास म्हणतात, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
जमीन पायाखालची काढताय आणि कोणत्यातरी व्यापाऱ्यांना विकताय, आपण कोणासाठी जमीन सोडतोय, काय करतोय याचं भान नाही आपल्याला. तो दाभोळला इन्नॉनचा प्रकल्प आला, तेव्हाी विरोध झाला. तेव्हा जमीन विकली कोणी? तुम्ही तुम्हाला माहितच नव्हतं येथे प्रकल्प येणार? अणुऊर्जा प्रकल्प येणार आहे माहितच नव्हतं.
जमिनी विकून मोकळे झालात. पण हजारपट किंमतीला परप्रांतीयांनी जमिनी विकल्या. नाणारलाही तेच झालं, बारसूलाही तेच झालं. आमच्याही जमिनी पायाखालून जातायत, तुम्हाला कळतच नाहीय. किती काळ रडत बसणार आहात? असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.