रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी कोकणात कितीही सभा घेतल्या तरी रामदास कदम आणि योगश कदमांना काही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदमा यांनी केलंय. दरम्यान, आज रत्नागिरीतील खेडमध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
एमआयएम जातीयवादी, औरंगजेब त्यांचा कोण लागतो ? ; अंबादास दानवे संतापले..
रामदास कदम म्हणाले, खेडच्या सभेसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, जिल्ह्यांमधून लोकं आणले जात आहेत, याचा अर्थ रामदास कदमांचा त्यांनी धसका घेतला आहे. त्यांच्या सभेला स्थानिक कमी लोकं येणार असल्याने त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी आम्हाला फरक पडणार नसल्याचं म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा; तोफ कुणावर धडाडणार ?
खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि राहणार. बाहेरचे लोकं इथं येऊन ते भाषण करुन निघून जाणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये असताना पर्यावरण खात्याला कोणतेही बजेट नव्हतं. मला काहीतरी द्यावं म्हणून हे खातं दिल्याचा खुलासा कदम यांनी यावेळी केला आहे.
लोकशाही टिकवण्यासाठी कपिल सिब्बल यांच्यासोबत उभं राहा, उद्धव ठाकरेंचं आवाहन
तसेच रामदास कदम आख्या महाराष्ट्राला माहित आहे. माझ्या मुलाला निवडून कसं आणायचं हे मला चांगलंच माहिती असून आपल्याच पक्षाच्या नेत्याला पाडायचं आणि दुसऱ्याच्या आमदाराला भाड्याने घ्यायचं काम ठाकरे करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
राज्यात बदल झाला नसता तर आम्हांला संपवण्यात उद्धव यशस्वी झाले असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला आहे. सारखं खोके म्हणतात, आम्हांला विकासकामांसाठी सरकारने खोके दिलेत. त्यातून आम्ही लोकांची विकासकामे करत असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, लोकांना विकास कामे मिळाल्यास पाठीशी राहणारचं, ठाकरेंनी कितीही प्रयत्न केला तरी रामदास कदम आणि योगेश कदमला काही फरक पडणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.