एमआयएम जातीयवादी, औरंगजेब त्यांचा कोण लागतो ? ; अंबादास दानवे संतापले..

एमआयएम जातीयवादी, औरंगजेब त्यांचा कोण लागतो ? ; अंबादास दानवे संतापले..

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनात काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी यावर जोरदार हल्ला चढविला आहे.

हे सुद्धा वाचा : निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, राऊतानंतर अंबादास दानवेही 

‘एमआयएम ही संघटना छत्रपती संभाजीनगर नावाविरोधात आंदोलन करते. आम्ही वारंवार सांगतो, की या एमआयमचा औरंगजेब कोण लागतो ?, ही एमआयएम औरंगजेबाच्या विचाराला मानते का ?, असे परखड सवाल दानवे यांनी उपस्थित केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी या शहराची भावना या जिल्ह्याची भावना लक्षात घेऊन या शहराला व जिल्ह्याला हे नाव दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे-फडणवीस सरकार नंतर केंद्र सरकारनेही या गोष्टीचा विचार करून याला मंजुरी दिली आहे. त्याचे स्वागत आम्ही केले.

Chhatrapati Sambhajinagar नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले ‘औरंगजेबा’चे होर्डिंग्ज

मात्र, एमआयएम (MIM) ही संघटना वारंवार जातीयवादाचे स्वरूप धारण करते. औरंगजेब यांचा कोण लागतो, हे आम्ही विचारतो. एमआयएम या शहरात जातीयवाद निर्माण करत आहे आणि त्याला उत्तर द्यायला आम्हीही सक्षम आहोत, असे आव्हान दानवे यांनी दिले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube