Vinayak Raut on Narayan Rane : कोकणातील रत्नागिरी-सिधुदुर्ग (Ratnagiri-Sidhudurg Lok Sabha) जागेवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. या जागेवर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली. तर विनायक राऊत (Vinayak Raut)हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. दरम्यान, आता राऊतांनी राणेंवर टीका केली. नारायण राणेंना तिसऱ्यांदा चितपट करण्याची संधी मिळणे मी भाग्य समजतो, असं राऊत म्हणाले.
आज (५ एप्रिल) चिपळूणमध्ये इंडिया आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी विनायक राऊत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट)चे स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, नारायण राणे यांना आपण आव्हान मानत नाही. त्यांच्यापेक्षा किरण सामंत उमेदवार असते तर ते माझ्यासाठी आव्हानात्मक असते. विरोधक म्हणून कोणीही येऊ दे, ते कमीत कमी अडीच लाखांच्या फरणाने आपटणार, असा राऊत यांनी लगावला.
तुम्ही काँग्रेस पक्ष कुठे नेऊन गहाण टाकला…; महसूलमंत्री विखेंचे थोरातांवर टीकास्त्र
नारायण राणेंना सलग तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागणार आहे. कोकणातून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तसेच राणेंची उमेदवारी अद्याप जाहीर झाली, महायुतीचा उमेदवार १२ तारखेपर्यंत ठरला तरी पुष्कळ आहे, असा टोला राऊतांनी लगावला.
दरम्यान, नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. तर किरण सामंत यांनी आपला दावा मागे घेत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मात्र, नंतर ती पोस्ट त्यांनी हटवली. त्यानंतर काल उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर शिवसेनेचाच दावा असल्याचं सांगितलं.