Download App

अनिल परबांचा पाय आणखी खोलात; ईडीकडून 10 कोटींची मालमत्ता जप्त

  • Written By: Last Updated:

Anil Parab :  ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी संबंधित दापोली येथील साई रिसॉर्ट ईडीने ताब्यात घेतले आहे. याबाबत ईडीने ट्विट करत माहिती दिली आहे. जवळपास 10 कोटी रुपयांची ही मालमत्ता आहे. गेल्या काही अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाचा तपास करत होती. त्यानंतर आता ई़डीने हे रिसॉर्ट ताब्यात घेतले आहे.

ईडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ED ने अनिल परब, साई रिसॉर्ट NX आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात कोस्टल रेग्युलेशन झोन (नो डेव्हलपमेंट झोन) अंतर्गत येणार्‍या गट क्रमांक 446, मुरुड, दापोली, रत्नागिरी येथील जमिनीवर बांधलेले “साई रिसॉर्ट NX” ताब्यात घेतले आहे. 10.20 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

Raigad Landslide : क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर

दरम्यान, या प्रकरणामध्ये ईडीने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता ईडीने ही कारवाई केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात ही तक्रार केली होती. सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्टला अनेकवेळा भेट देखील दिली होती. पण ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माझ्या या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे अनेकवेळा म्हटले आहे. यावर आता ईडीने केलेल्या ट्विटमध्ये अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

Tags

follow us