Raigad Landslide : क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर

इरशाळवाडी गावात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानंतर असे विदारक दृश्य दिसत आहे.

दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर येथे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

एनडीआरएफ, अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि नागरिक ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत.

मुसळधार पावसामुळे गावातील घरे अक्षरशः कोसळली आहेत.

घरांचे पत्रे, भिंती कोसळल्याने लोकांचा हक्काचा निवारा हिसकावला गेला आहे.

घराच्या छतावर चढून कोणी घरात अडकले आहे का याची खात्री केली जात आहे.

घटनास्थळी बचावकार्य करणाऱ्या यंत्रणांची संख्या वाढत आहे.

गावात रस्ता नसल्याने असे मोठे डोंगर पार करून जाण्याशिवाय पर्याय नाही.
