Download App

‘तत्कालीन पालकमंत्री पूर आला म्हणून पळून जात होते’; उदय सामंतांचा परबांवर आरोप

Uday Samant On Anil Parab : रत्नागिरीत पुर आला तेव्हा तत्कालीन पालकमंत्री पळून जात होते, असा आरोप मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माजी मंत्री अनिल परबांवर(Anil Parab) केला आहे. चिपळूणमधील आयोजित कार्यक्रमात उदय सामंतांनी हा आरोप केला आहे. या आरोपामुळे आता पुन्हा एकदा रत्नागिरीच्या राजकारणात खळबळ उडालीयं.

Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर रिलीज डेट जाहीर

उदय सामंत म्हणाले, मी रत्नागिराला आलेला पूर अनुभवलेला आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. तेव्हा मी पालकमंत्री नव्हतो, तत्कालीन पालकमंत्र्यांना मुंबईला जायचं होतं तेव्हा ते मार्ग बदलून मुंबईला गेले होते पण
मी पालकमंत्री नसतानाही हटलो नाही तुमच्या सोबत उभं राहिलो, त्यामुळे राज्यकर्त्यांमधला फरक जनतेने समजून घेतला पाहिजे, असं सामंत म्हणाले आहेत.

CM Shinde : महाराष्ट्राचे ‘अल्लाबक्ष’ भाजपच्या प्रचाराला निघालेय; ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तसेच जे पालकमंत्री पूर आलायं म्हणून पुरातनं जायला रस्ता नाही म्हणून गोवा मार्गाने मुंबईला जातात हे किती योग्य आहे. मी पालकमंत्री नसतानाही कोणतीही उर्मठगिरी न करता जनतेसोबत होतो, राज्यकर्त्यांमधला फरक चिपळूणकरांनी ओळखला पाहिजे ही विनंती, असल्याचंही ते म्हणाले आहेत.

MLA Disqualification : आमदार अपात्र होणार? नार्वेकरांच्या उत्तराने वाढला ‘सस्पेन्स’

पुर आला त्याचं दिवशी सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत नागरिकांना पुरातून बाहेर काढणं सोडून तत्कालीन पालकमंत्री मला मुंबईला जाण्यासाठी पुरातून रस्ता काढून द्या असं म्हणत होते, पूर आला म्हणून ते मुंबईला पळून जायची वाट पाहत होते, असाही उदय सामंतांनी आरोप केला आहे.

भारतीयांनी मुहूर्त साधला! धनत्रयोदशीला 42 टन सोन्याची खरेदी; 30 हजार कोटींची उलाढाल

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणात मुसळधार पाऊस झाला. कोकणातील नद्या दुथडी भरुन वाहत असल्याची परिस्थिती होती, वशिष्ठ नदीला पूर आल्याने चिपळून शहर आणि परिसरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाकडून मदत करण्यात येत होती. दरम्यान, या काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं. तत्कालीन मंत्री अनिल परब पूर आला म्हणून मुंबईला पळून जायची वाट पाहत असल्याचा आरोप सामंतांनी नाव न घेता केला आहे.

दरम्यान, चिपळूणच्या आयोजित कार्यक्रमातून मंत्री उदय सामंतांनी अनिल परबांवर आरोप केला आहे. या आरोपांवर आता अनिल परब काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us