CM Shinde : महाराष्ट्राचे ‘अल्लाबक्ष’ भाजपच्या प्रचाराला निघालेय; ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
CM Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचारासाठी काम करणार आहे. त्यावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून हा निशाणा साधण्यात आला आहे.
काय म्हटंल आजच्या सामनामध्ये?
‘एकच प्याला ‘नाटकातील ‘आर्य मदिरा मंडळा’त होणारे नाटक आज महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत वावरत आहेत व ते भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करीत आहेत. सत्य पायदळी तुडवून त्यांनी ‘खोटे’ छातीशी धरले आहे. शिंदे कधी एखाद्या तीर्थस्थानी असतात तर अनेकदा दिल्लीचरणी. आता ते मन रमविण्यासाठी स्वतःला भाजपच्या प्रचारात गुंतवून घेत आहेत. नकली आणि डुप्लिकेट शिवसेनेच्या प्रचारात राम उरला नाही हे त्यांना वर्षभरात समजले हे बरे झाले. महाराष्ट्राचे ‘अल्लाबक्ष’ भाजपच्या प्रचारास निघाले आहेत. त्यांची ‘आखरी मंजिल’ तीच आहे!’ अशी टीका एकनाथ शिंदेंवर आजच्या सामनामध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारासाठी संबंधित राज्यांमध्ये तळ ठोकून आहेत. त्यात आता मित्रपक्ष म्हणून शिवसेनेच्या शिंदेंना देखील भाजपच्या याप्रचारामध्ये साथ द्यायची आहे. ते देखील या प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाने त्यांची तुलना थेट एकच प्यालामधील तळीरामांशी केली आहे.
Kurla fire : दिवाळीदरम्यान दुर्घटना, कुर्ल्यातील नेहरूनगरच्या इमारतीच्या टेरेसला आग
तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (11 नोव्हेंबर) सिकंदराबाद येथे सभा पार पडली. याच सभेत सभा चालू होण्यापूर्वी एक मुलगी लाइट-साऊंडसाठी बांधलेल्या खांबावर चढली. मोदी यांनी मुलीला टॉवरवर चढताना पाहिले तेव्हा त्यांनी तिला खाली उतरण्याचे आवाहन केले.