“बारसू मध्ये रिफायनरी (Barsu Refinery) व्हावी यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहलं नव्हतं. तर कोकणातील बारसूमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहलं होत.” असं उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिल आहे. बरसू मध्ये आज रिफायनरी सर्व्हे विरोधात आंदोलन चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत पत्रकारांशी बोलत होते.
पोलिसांकडून मीडिया प्रतिनिधींना हटवलं जात आहे, अशी तक्रार केली गेली आहे. त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, अशी कोणतीही घटना घडली नाही. मी स्वतः तिथली परिस्थिती पाहतो आहे, फक्त काही लोक आंदोलक महिलांना उलटसुलट प्रश्न विचारत आहेत. त्यांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांना रोखण्यात आलं आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
बारसू रिफायनरी हा क्रांतिकारी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील एक ते डिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे आंदोलकांची समजूत काढली जाईल. काही लोकांना असं वाटत होत की तिथे मोठे आंदोलन होईल, पण तसं झालं नाही. त्यामुळे लोक जालियनवाला बाग होईल. अशी टीका करत आहेत. असं त्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं.
मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की; आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार, सामनातून टोलेबाजी
बारसू मध्ये रिफायनरी व्हावी यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहलं नव्हतं. तर कोकणातील बारसूमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहलं होत. उद्धव ठाकरे यांनीच मुख्यंमत्री असताना केंद्र सरकाराला यासाठी पत्र लिहलं होत. आता संजय राऊत यावर टीका करत आहेत पण स्थानिक आमदार यांच्या विरोधात बोलत नाहीत. त्यामुळे अशी दुट्टपी भूमिका समोर येत आहे. लोकांना ते कळत आहे. अशी टीका त्यांनी केली.
“खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा.” अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
किसान सभेचे पुन्हा राज्यव्यापी आंदोलन, महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ
अजित पवार यांनीही लिहलं आहे की, “रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं.”