Udya Samant On Nana Patekar राजकारण्यांना थेट प्रश्न विचारणार महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर आहेत.काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी मुलाखत घेतली त्यावेळी त्यांना नानांनी थेट प्रश्न विचारले होते. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सामाजिक काम करत असतो. आणि सामाजिक काम करण्यात तो इतर पुढाऱ्यां पेक्षा पुढे असतो. नाना पाटेकर अशा प्रकारे काम करून राजकारण्यांना ट्रॅकवर आणण्याचे काम करत आहेत. असे मंत्री उदय सामंत म्हणाले ते रत्नागिरीत नाम फाऊंडेशनच्या एक कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना सामंत म्हणाले दोन वर्षा पूर्वी जो पूर आला होता तेव्हा रत्नागिरीतील चिपळूण शहर पूर्ण पाण्याखाली होत. तेव्हा शहरातील पूर्ण गाळ काढे पर्यंत मी तेथे बसून होतो. कुणालाच काळात नव्हतं की हा पूर कसा थांबवावा शेवटी सरकारने एक सर्वे केला आणि त्यातून समोर आले की वाचिश्ती नदीचा गाळ काढला तर हा पूर कमी होईल. मग सरकारने अंदाज पत्रक तयार करून टेंडर काढली. त्यावेळी नाम फाउंडेशनने समोर येऊन सरकारला गाळ काढण्यासाठी मदत केली. फक्त आठ दिवसात नाम फाऊंडेशनने हे काम केलं.
जामखेड बाजार समिती राष्ट्रवादी सात तर भाजपा चार जागेवर विजयी
त्यानंतर मागच्या वर्षी भरपूर पाऊस पडला नदीला पूर देखील आला परंतु या पुराचे एक थेंब पाणीदेखील चिपळूण शहरात आले नाही. हे फक्त नाव फाउंडेशनच्या कामामुळे शक्य झाले. याच श्रेय जेवढं शासनाला जात तेवढंच नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि नाम फाऊंडेशनला जाते.
सामाजिक काम करत असताना कशा पद्धतीने एखाद्या लोकप्रतिनिधींच्या मानगुडीवर बसून काम करायचं असत हे मल्हार पाटेकर यांच्याकडून शिकावं असं मी म्हणेल. समाजामध्ये राहून जर सामाजिक काम करायचं असेल तर भविष्यात नाम फाउंडेशन शिवाय दुसरा पर्यायच असू शकत नाही असे यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले.